Thursday, February 26, 2026
Home ताज्या बातम्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या पासून सुरूवात भक्ती शक्तीच्या अनोख्या संगमाची ३८ वर्षाची परंपरा

0
2

जामखेड न्युज—–

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या पासून सुरूवात

भक्ती शक्तीच्या अनोख्या संगमाची ३८ वर्षाची परंपरा

जामखेड येथील विठ्ठल मंदिर जामखेड येथे दि. २७ पासून परंपरागत जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याला भक्तीमय वातावरणात भव्य प्रारंभ होत आहे.

तब्बल ३८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या सप्ताह सोहळ्याची परंपरा आजही त्याच उत्साहात व श्रद्धेने जपली जात आहे.

या सप्ताहात विविध नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले असून दररोज मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. सर्व भक्तांसाठी अन्नदानाचीही व्यवस्था जागेवर करण्यात आली आहे.

सप्ताहादरम्यान तुकाराम गाथा पारायण तसेच शिवचरित्रावर आधारित “शिवरायाचे आठवावे रूप” हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिजाऊंनी शिवबांना दिलेले संस्कार आणि शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग यांवर माननीय इनामदार सर, प्रा. होशिंग सर व प्रा. सदानंद होशिंग सर हे तीन दिवस व्याख्यानमालेतून शिवचरित्र मांडणार आहेत.

“शिवरायाचे आठवावे रूप” हा कार्यक्रम दि. ३ मार्चपासून सायं. ४.०० ते ५.३० या वेळेत होणार असून विशेषतः महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


भक्ती आणि शक्तीचा संगम घडवणारा हा सप्ताह जामखेडकरांसाठी आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्व ठरणार असून या कार्यक्रमाचा सर्व जामखेडकरांनी व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!