शेतकऱ्यांना 38 लाखांचा गंडा घालणारा आरोपी खर्डा पोलीसांनी सापळा लावून केला जेरबंद
ऊस मजूर पुरवठ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो रुपयांची लूट करणाऱ्या आरोपीला खर्डा पोलीसांनी सापळा लावून जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी मजूर पुरवठा करतो, असे भासवून शेतकऱ्यांची कोट्याहून अधिकची फसवणूक करणाऱ्या आरोपीला खर्डा पोलीस स्टेशनने जळगाव जिल्ह्यातून अटक केली आहे.
पोलिस माहितीनुसार, वाकी (. खर्डा) येथील शेतकरी हरीदास तुकाराम शेळके, दादा सौदागर कोरडे, राजकुमार अर्जुन सावंत, वाल्मिक शंकर पवार आणि राहुल मनोहर रोडे यांच्या तक्रारीवरून जाधवराव चंदन परदेशी (रा. घुसर्डी, ता. भडगांव, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा १९/२०२६ (भा.न्या.सं. २०२३ कलम ३१६(२), ३१८(४)) दाखल झाला. आरोपीने स्टॅम्प पेपरवर नोटरी करून विश्वास संपादन केला आणि शेतकऱ्यांकडून रोख, फोन पे आणि बँक ट्रान्सफरद्वारे एकूण ३८ लाख १५ हजार रुपये वसूल केले. पण मजूर पुरवठा करायचा तो एकही मजूर दिला नाही आणि नंतर फोन बंद करून फरार झाला.
सपोनि उज्वलसिंह राजपुत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नागद (ता. कन्नड, छत्रपती संभाजीनगर) येथून आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान करमाळा (सोलापूर) आणि आष्टी (बीड) येथील शेतकऱ्यांचीही त्याच्याकडून फसवणूक झाल्याचे उघड झाले.
आरोपीच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे पोलिसांना समजले.वरिष्ठ सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पो.अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पो.अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात सपोनि उज्वलसिंह राजपुत, पो.हवा. संभाजी शेंडे, पोकाँ राहुल शिंदे, शशी म्हस्के, विष्णु आवारे, अशोक बडे, बाळु खाडे यांचा समावेश होता.
तपास सुरू असून, आणखी फसवणूक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.