Sunday, February 8, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गाला तडे निकृष्ट कामामुळे...

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गाला तडे निकृष्ट कामामुळे आठच दिवसांत तडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा आंदोलनाचा इशारा

0
2

जामखेड न्युज——

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गाला तडे

निकृष्ट कामामुळे आठच दिवसांत तडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा आंदोलनाचा इशारा

अठरा महिन्याची मुदत असताना तीन वर्षे झाले तरी अद्याप रस्ता पुर्ण झालेला नाही. आठ दिवस काम झाले की, दोन महिने काम बंद असते अतिक्रमणे न काढताच रस्त्याचे कसेतरी रडतखडत काम करत आहेत तेही निकृष्ट प्रतिचे काम होत आहे. आठच दिवसांत रस्त्याला तडे गेले आहेत. यामुळे रस्ता कसा टिकणार असा प्रश्न विचारला जात आहे. तडे गेलेले काम काढून दर्जेदार काम करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी दिला आहे.

जामखेड शहरातील चालु असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु आहे शहरातील रस्त्यांच्या विकासाच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी यामुळे उत्कृष्ट दर्जाचे काम होणार नाही हे उघड होत आहे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही शेवटी आता उडत असलेली धुळ ही तरी बरी होती अशी म्हणण्याची वेळ जामखेडकरांनवर येणार आहे का तर चालु असलेला रस्ता हा काही महिनाभरात खराब होऊन मग उडणारी धुळ ही सिमेंट खडीडस्टर याचा त्रास होणारच आहे.

रस्त्यांच्या कामात लोखंडी गजाची बांधणी करण्यात आलेली नाही निकृष्ट दर्जाचे कॉंक्रिट मिश्रण वापरल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत यामुळे काही दिवसांतच रस्ता पुर्णपणे खराब होणार आहे आणि भविष्यात भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे भेगा पडणार आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने शहराचा विकास खुंटला आहे.

जामखेड शेजारी आष्टी, पाटोदा, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्यावरील जामखेड वगळता सर्व अतिक्रमणे हटवली आहेत फक्त जामखेडच अपवाद आहे. तेव्हा जामखेड शहरातील काही अतिक्रमणे निघाली पण काही मोठमोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या कायमचीच झाली आहे. नेमके ठेकेदार कोणाचेच ऐकत नाही. अतिक्रमणे निघत नाहीत. याला अभय कोणाचे आहे. याचीच चर्चा सुरू आहे. जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम करताना गटारांचे काम कसे का असेना झाले आहे. अनेक ठिकाणी वाकडे तिकडे गटार झाले आहे. आता रस्त्याला तडे गेले आहेत.

 

गटाराबाहेर नगरपरिषदेची दहा फूट जागा आहे पण सध्या अनेक ठिकाणी गटारावर पक्के काम करून टपऱ्या टाकल्या आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक मोठ मोठ्या लोकांनी भाड्याने दिल्या आहेत. तेव्हा नगरपरिषद हे अतिक्रमण केव्हा हटवणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

अतिक्रमण हटल्याशिवाय विकास अशक्य आहे.शहरातील रस्ते नियमानुसार रोड सेंटरपासून १५-१५ मीटर म्हणजे पूर्ण ३० मीटर रुंदीचे झाले पाहिजेत.खरेदी खतानुसार जागा मोजून उर्वरित सर्व अतिक्रमण तत्काळ हटविणे अत्यावश्यक आहे.

काहींच्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे संपूर्ण जामखेड शहराचा विकास रखडला आहे.गटार, पाणीपुरवठा, रस्ते – सगळी कामे अडथळ्यात आहेत. आता प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनीच अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे. रस्ते मोकळे करा… शहर वाचवा! अशी चर्चा शहरात सुरू आहे.
दर्जेदार काम करावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!