युवकाच्या मृत्यू नंतर दोनच दिवसांत पुन्हा ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दोन जण गंभीर जखमी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तातडीची मदत
जामखेड शहरातील कर्जत रोडवर दोन दिवसांपूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून युवकाचा मृत्यू झाला होता. हि घटना ताजीच असताना आज पुन्हा ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली मुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज कर्जत रोडवर ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दोन युवक गंभीर जखमी झाले असल्याची माहितीनगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी फोनवर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. कोठारी यांनी ताबडतोब जखमींना दवाखान्यात आणण्याची सोय केली.
शहरातील अहिल्यावस्ती कर्जत रोड वर पुन्हा ट्रॅक्टरला धडकून दोन जण जखमी त्यातील दोघांचे पाय फ्रॅक्चर आहेत घटनेची माहिती अशी अहिल्यानगर वस्ती कर्जत रोड येथून भाऊसाहेब पद्माकर लबडे वय ४५पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा आहिल्यानगर आणि जालिंदर तुळशीराम सांगळे वय ४६ मुक्काम पोस्ट कवडगाव तालुका जामखेड मोटरसायकलवर येत असताना अंधारात ट्रॅक्टर ट्रॉली दिसली नाही त्याला धडकून दोघे जखमी झाले असून पाय मोडले आहेत.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांचा फोन आला कोठारी यांनी ताबडतोब आपले मित्र दीपक भोरे आणि ऋषिकेश शेळके यांना पाठवून ताबडतोब दवाखान्यात दाखल केले.
दोघांवर उपचार चालू आहेत सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली असून पुढील तपास चालू आहे.