फाळणीची वेदना सदैव मन जाळते, ही आग कशी विझवणार?, शिवसेनेचा मोदींना सवाल

0
216
जामखेड न्युज – – – 
काल देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी14 ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना स्मृतीदिन म्हणून पाळण्याचं त्यांनी जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
त्या वेदनेची खपली उचकटून काढली
सामनात म्हटलं आहे की, दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली, अशी टीका करण्यात आली आहे.
वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधींच
फाळणीवर उतारा म्हणून भाजपाने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड हिंदुस्थानचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता. पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या. इंदिरा गाधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्वि राष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बीजं रोवली जाऊ नयेत, हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे, असं देखील शिवसेनेनं म्हटलं आहे.
 …तर बरे झाले असते
अग्रलेखात म्हटलं आहे की, फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस निवडला. हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या, की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा, यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते, अशा शब्दांत मोदींवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here