जामखेड न्युज—–
नागेश विद्यालयात 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त INDIAN ARMY (इंडियन आर्मी) नाव साकारून देशाला मानवंदना
माजी विद्यार्थी मेळावा होणार संपन्न
रयत शिक्षण संस्थचे श्री नागेश विद्यालय जामखेड व ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न होणार आहे.77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ” राष्ट्र प्रथम ” उपक्रम अंतर्गत INDIAN ARMY (इंडियन आर्मी) नाव साकारून देशाला मानवकेले देण्यात येणार आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे.

” राष्ट्र प्रथम ” उपक्रम अंतर्गत जगातील सर्वात मोठे नाव” INDIAN ARMY ” मानवी रचनेत विद्यार्थी बैठक रचनेत साकार होणार असून देशभक्ती गीतावर कवायत, संचलन सादर होणार आहे. या मध्ये श्री नागेश विद्यालय,ज्युनिअर कॉलेज ,कन्या विद्यालय व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कॅडेट, सर्व शिक्षक आजी-माजी सैनिक, पालक, ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मानवी रचनेतील “INDIAN ARMY (इंडियन आर्मी) ” हे नाव साकारण्यात येणार आहे. या मानवी चित्राची लांबी 160व रुंदी 165 फूट असून क्षेत्रफळ 26400 स्क्वेअर फुट आहे . या मानवी रचनेतील चित्रात भव्य 175 फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवनार आहे. कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे साकारणार आहेत. श्री नागेश व कन्या विद्यालय मधील 2600 विद्यार्थी विद्यार्थिनी देशभक्ती गीतावर कवायत सादर करणार आहेत. १७ महा बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालय युनिटचे एनसीसी कॅडेट उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना देणार आहेत.

सोमवार 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वा ध्वजारोहण होणार आहे.

तसेच 26 जानेवारी 11.00 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त व देशभक्ती उपक्रम पाहण्यासाठी व माजी विद्यार्थी मेळाव्या साठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य मडके बी के यांनी केले.










