महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) तर्फे २४ जानेवारी हा दिवस ‘चालक दिन’ (Driver’s Day) म्हणून साजरा केला जातो हा दिवस एसटी बसेसचे चालक, त्यांच्या कठोर परिश्रमाला आणि विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांच्या सुरक्षित प्रवासाच्या योगदानाला समर्पित आहे जामखेड तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने एस टी चालक दिन दि २४ रोजी बसस्थानक येथे साजरा करण्यात आला.
यावेळी जामखेडचे आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे, शिव परिवहन वाहतूक व कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ जायभाय, प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष वसंत राळेभात, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम अंदुरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मिठूलाल नवलाखा, वाहतूक नियंत्रक भाऊसाहेब लटपटे, नवीन सोनार, चालक बाळासाहेब कुलेँकर, एस एम मोरे, व्ही एस जायभाय, बी के घुले, सचिन बिंरंगळ, वाहक बी ए माळी, बळीराम मेहेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या वतीने चालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना जायभाय म्हणाले की जुन्या गाड्या असल्याने चालकांना बस चालवतांना कसरत करावी लागत आहे आमच्यावर पन्नास प्रवाशांची जबाबदारी देखील असते अशा वेळी बस बंद पडल्या नंतर प्रवाशांना देखील उत्तर द्यावे लागते त्यामुळे शासनाने याचा विचार करून नवीन बसेस द्याव्यात म्हणजे सुरक्षित प्रवास होईल आज प्रत्येक चालक जीव मुठीत धरून गाडी चालवत आहेत यांचा विचार होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मिठूलाल नवलाखा यांनी सांगितले की जामखेड आगाराकडे परिवहन विभागाचे लक्ष नाही कारण चार जिल्हाच्या सरहद्दीवर असणारा जामखेड आगाराचे उत्पन्नात घट झाली आहे त्यामुळे या आगारास नवीन बसेस मिळाव्यात अशी मागणी आहे तसेच बसेस ची संख्या कमी झाली आहे व अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे कर्मचारी वाढवले जावेत जामखेड आगार अनेक अडचणी निर्माण होत आहे याला जिल्ह्य़ातील अधिकारी डोळेझाक करत आहेत यात सुधारणा झाली नाही तर प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे