मुख्याध्यापक दत्ता काळे यांना निरोप तर भरत लहाने यांचे श्री साकेश्वर विद्यालयात स्वागत

0
913

जामखेड न्युज——

मुख्याध्यापक दत्ता काळे यांना निरोप तर भरत लहाने यांचे श्री साकेश्वर विद्यालयात स्वागत

दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक दत्ता काळे यांची न्यु इंग्लिश स्कूल राजुरी येथे बदली झाली तर भरत लहाने यांची बढती मुख्याध्यापक पदी झाल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.

श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे निरोप व स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष नुतन मुख्याध्यापक भरत लहाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, मुख्याध्यापक दत्ता काळे, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

दत्ता काळे यांनी सुमारे आठ वर्षे दोन महिने श्री साकेश्वर विद्यालयात कडक शिस्तीचे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली त्यांना याच विद्यालयात असताना त्यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार मिळाला आता त्यांची बदली न्यु इंग्लिश स्कूल राजुरी येथे झाली आहे.

भरत लहाने यांची सेवा शिक्षक म्हणून २८ वर्षे हाळगाव, राजुरी, साकत, ल. ना. होशिंग विद्यालय येथे सेवा केली. तसेच तालुका गणित संघटनेचे सचिव तसेच जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे खजिनदार म्हणून काम केले. जिल्हा गणित संघटना कार्यकारिणी सदस्य तालुका टीडीएफ सचिव, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी पगारदार नोकरांची पतसंस्था सचिव या पदावर काम केले आहे. एक कडक शिस्तीचे गणित शिक्षक म्हणून ख्याती आहे. आता श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे त्यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम वराट यांनी तर विद्यार्थी लक्ष्मी वराट, शिक्षक अर्जुन रासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता काळे, श्रीराम मुरूमकर व अध्यक्षीय मनोगत भरत लहाने यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here