आरोग्य व्यवस्थेत तात्काळ सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडणार – पांडुरंग भोसले दोन दिवसांत कारवाई करतो – जिल्हा आरोग्य अधिकारी

0
874

जामखेड न्युज——-

आरोग्य व्यवस्थेत तात्काळ सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडणार – पांडुरंग भोसले

दोन दिवसांत कारवाई करतो – जिल्हा आरोग्य अधिकारी

जामखेड सरकारी दवाखान्यातील अनियमित वर्तन, मनमानी कारभार व आरोग्य सेवेत होणारी कंत्राटी कर्मचार्यामुळे अडथळे याबाबत अनेक तक्रारी होत्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत कारवाई ची मागणी केली होती. तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानुसार दोन दिवसांत कारवाई करतो असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड सरकारी दवाखान्यात विविध प्रकारचे वादविवाद, मनमानी कारभार तसेच शिस्तभंगाच्या घटना घडत असल्याचे जनतेच्या तक्रारीतून समोर येत आहे. यामुळे जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील हस्तक्षेप, रुग्ण व नातेवाईकांशी अयोग्य वर्तन, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, तसेच शासकीय वैद्यकीय सेवेत अनावश्यक हस्तक्षेप केल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. या कारणामुळे रुग्ण सेवेत शिस्त, पारदर्शकता व सुव्यवस्था राहिलेली नाही असे चित्र निर्माण झाले आहे तसेच दवाखान्यात औषधांचा तुटवडा/अपुरा पडत आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या साहित्याबाबत अनियमितता, एक्स-रे, सलाईन, खोकल्याचे औषध इत्यादी उपलब्धतेबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत आहे.

रुग्ण आहार वितरण व्यवस्थेत विसंगती अशी अनेक समस्या स्थानिकांकडून सातत्याने मांडल्या जात आहेत. कोव्हिड काळातील लसीकरण प्रक्रियेबाबतही आर्थिक अनियमिततेच्या संदर्भातील माहिती नागरिकांनी मांडलेली असून याबाबत वस्तुस्थिती निष्पन्न करणे आवश्यक आहे.


वरील सर्व बाबी लक्षात घेता, जामखेड सरकारी दवाखान्यातील कामकाज, मनुष्यबळ, साहित्य वितरण, औषध साठा, आर्थिक व्यवहार व कर्मचारी कार्यपद्धती याबाबत स्वतंत्र चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी, तसेच सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती तसेच नवीन दवाखान्याचे काम पूर्ण होत आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ दखल घेउन दोषींवर कारवाई करावी.


यावेळी वैद्यकीय जिल्हा अधिकारी शिवशंकर वंलाडे यांनी दोन दिवसांत कार्यवाही करतो असे आश्वासन दिले यावेळी पांडुराजे भोसले यांनी जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले मनसेचे प्रदीप टापरे राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश निमोणकर, गणेश काळे, केदार रसाळ, उमेश राळेभात, भैय्या सोनवने, जगन्नाथ म्हेत्रे, अक्षय घागरे, अजय गौड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here