सावधान नियमबाह्य वाहनांविरोधात जामखेड पोलीस अँक्शन मोडवर तीन दिवसांत ५१ केसेस करत पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल

0
1326

जामखेड न्युज——

सावधान नियमबाह्य वाहनांविरोधात जामखेड पोलीस अँक्शन मोडवर

तीन दिवसांत ५१ केसेस करत पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल

जामखेड शहरातील खोळंबलेला रस्ता, नियमबाह्य वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून जामखेड पोलीसांनी नियमबाह्य वाहनांविरोधात धडक मोहीम राबवत तीन दिवसांत ५१ केसेस करत पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जामखेड पोलीसांनी आगामी येणाऱ्या 31 डिसेंबर च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा चौक, जामखेड येथे नाकाबंदी लावण्यात आली सदर नाकाबंदी करीता सपोनि वर्षाबाई जाधव, पोसई किशोर गावडे, पोसई संपत कन्हेरे, सफौ. शिवाजी कदम,पोना. रविंद्र वाघ, पोकॉ सचिन चव्हाण, पोकॉ. कुलदीप घोळवे, पोकॉ. आकाश शेवाळे, पोकॉ. ईश्वर परदेशी,पोकॉ.योगेश दळवी, पोकॉ, श्रीकांत शिदे, पोकॉ गणेश काळाणे, पोकॉ ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोकॉ प्रकाश जाधव,पोकॉ दत्तु बेलेकर तसेच होमगार्ड स्टाफ यांच्यासह नाकाबंदी दरम्यान विना नंबर, विदाऊट हेल्मेट, काळ्याकाचा, ट्रिपल सिट इत्यादी वर खालील प्रमाणे कारवाई करुन दंड आकरण्यात आला आहे. या  कामगिरी चे सामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे.

जामखेड पोलीसांनी तीन दिवसांत ५१ केसेस करत पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दि. २८ डिसेंबर रोजी
1. 10 केसेस ट्रिपल सीट दंड 10000.
2. 05 ब्लॅक फिल्म फोर व्हीलर दंड 5000
3. 15 केसेस एका बाजूने नंबर नसणे दंड 7500
टोटल केसेस 26 व दंड 26000.

दिनांक २९ डिसेंबर रोजी
1. 05 केसेस ट्रिपल सीट दंड 5000.
2. 02 ब्लॅक फिल्म फोर व्हीलर दंड 2000
3. 05 केसेस एका बाजूने नंबर नसणे दंड 6000
एकूण केसेस 12 दंड 12000

दिनांक 30 डिसेंबर रोजी
1. 02 केसेस ट्रिपल सीट दंड 2000.
2. 03 ब्लॅक फिल्म फोर व्हीलर दंड 3000
3. 07 केसेस एका बाजूने नंबर नसणे दंड 4000
एकूण केसेस 13 दंड 8000.

अशा प्रकारे तीन दिवसांमध्ये एकूण केसेस 51दाखल करत एकुण दंड 45000 (पंचेचाळीस हजार) रुपयांच्या दंड वसूल केला आहे.

तसेच दोन रोड रोमिओ विधी संघर्ष बालकांना पोलीस ठाण्यात नेऊन आई वडील बोलावून दिली समज दिली आहे. जामखेड पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे जामखेड करांनी स्वागत केले आहे व ही कामगिरी अशीच चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here