फरार आरोपींना अटक करा, झिक्री ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन
जामखेड तालुक्यातील झिक्री येथील सरपंचावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्यातील फारार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी झिक्री येथील जामखेड-नान्नज रस्त्यावरील भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच दोन तीन दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर जामखेड पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा झिक्री ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलना दरम्यान दिला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर सदरचा रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की दि 25 डिसेंबर 2025 रोजी येथील झिक्री येथे अनुदानाच्या पैसै वाटप या कारणावरून सरपंचाच्या कुटुंबावर स्थानिक तीन चार ग्रामस्थांनी बाहेरील गुंडांच्या मदतीने गावात येऊन दहशत पसरवत सरपंचावर व त्यांच्या कुटंबियांवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडुन एक महीना होऊनही उद्याप फरार आरोपींना पोलिसांन कडुन अटक झाली नाही. गेल्या एक महिन्यापासून सदरचे आरोपी हे फरार आहेत. याबाबत झिक्री ग्रामस्थांनी आरोपींना तातडीने अटक करवी या मागणीसाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र अद्यापही आरोपी फरार आहेत. याच आनुशंगाने झिक्री ग्रामस्थांनी शनिवार दि 27 डीसेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता संतप्त होत झिक्री येथिल जामखेड नान्नज रस्यावर रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी बोलताना सरपंच दत्तात्रय साळुंखे यांनी बोलताना सांगितले की संबधित आरोपी हा झिक्री ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक हा मोठ्या प्रमाणात योजनेचे पैसै लोकानकडुन गैरमार्गाने घेत होता. यावेळी त्या रोजगार सेवकास विरोध केला असता त्याने बाहेरील गुंडांच्या मदतीने माझ्यावर व माझ्या कुटुंबावर हल्ला केला आहे. एक महीना होऊनही घटनेतील आरोपी फरार आहेत. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच दोन दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर जामखेड पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्यात येईल तसेच तरी देखील आरोपी अटक झाले नाहीत तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण बसण्याचा इशारा देखील सरपंच दत्तात्रय साळुंखे यांनी दिला आहे.
रास्तारोको दरम्यान घटनास्थळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली व ग्रामस्थांच्या भावना जाणुन घेतल्या तसेच लवकरच आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक तयार करून तातडीने अटक करण्याचे अश्वसासन ग्रामस्थांना दिले यानंतर ग्रामस्थांनी आपले रास्तारोको आंदोलन मागे घेतले. या आदोलनात झिक्री ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विषेश म्हणजे या आंदोलनात महीला देखील सहभागी झाल्या होत्या. रास्तारोको आंदोलना दरम्यान जामखेड नान्नज रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वहातुक सुरळीत केल्यानंतर येथिल वहातुक पुन्हा सुरू झाली.