अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सन २०२६ च्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सन २०२६ साठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
यासंदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत: १. रक्षाबंधन: शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ २. अनंत चतुर्दशी: शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ ३. धनत्रयोदशी: शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६
या तिन्ही सुट्ट्या शुक्रवारी येत आहेत. या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील न्यायालयीन विभागास लागू नसतील, असेही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.