जामखेडची बारामती करू म्हणणाऱ्यांनी भानामती करून आमदारकी मिळवली – सभापती प्रा राम शिंदे नगरपरिषद निवडणूकीतील घवघवीत यशाबद्दल विजय उत्सवाची जाहीर सभा व सत्कार समारंभ

0
577

जामखेड न्युज——

जामखेडची बारामती करू म्हणणाऱ्यांनी भानामती करून आमदारकी मिळवली – सभापती प्रा राम शिंदे

नगरपरिषद निवडणूकीतील घवघवीत यशाबद्दल विजय उत्सवाची जाहीर सभा व सत्कार समारंभ

जामखेड ची बारामती करू म्हणून दोन वेळा सत्ता मिळवली पण बारामती नाही पण भानामती केली हे आता जामखेड करांच्या चांगले लक्षात आले आहे त्यामुळे या पराभवाची परतफेड जामखेड करांनी नगरपरिषद निवडणूक निकालात केली आता आपण जामखेड चा चेहरा मोहरा बदलू असे मत सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीतील घवघवीत यशाबद्दल आज जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, सभापती शरद कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद, प्रविण घुले, विजय चौधरी, शेखर खरमाळे, अशोक खेडकर, गणेश क्षिरसागर, डॉ. भगवानराव मुरूमकर, रवी सुरवसे, वैजनाथ पाटील, सोमनाथ पाचारणे, विष्णू भोंडवे, प्रविण चोरडिया, लक्ष्मी पवार, ज्ञानेश्वर झेंडे, प्रशांत शिंदे, चंद्रकांत राळेभात, अर्जुन म्हेत्रे, सचिन घुमरे, राहुल बेदमुथ्था, केदार रसाळ, प्रविण होळकर, मनोज कुलकर्णी, उद्धव हुलगुंडे, राम पवार, तुषार बोथरा यांच्या सह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रस्तावित करताना अमित चिंतामणी म्हणाले की, सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संधीविधानसभेचे अपयश पुसले सर्वाना बरोबर घेऊन जामखेड चा विकास करू असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, आपल्या काही उमेदवारांचा पराभव झाला त्यांना बरोबर घेऊन आपण विकासाची दिशा ठरवू विधानसभा पराभवाची सावड जामखेड करांनी नगरपरिषद निकालाने केली आहे. खेड पासून खर्डा पर्यंत सर्व मोठ्या गावचे सरपंच आपले आहेत. ज्यांना माणसे सांभाळता येत नाहीत ते माणुसघाणे आहेत. आता फिरकतही नाहीत. आक्रोश मोर्चा काढणाऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत.
या विजयाने आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्या उमेदवारांवर विरोधकांनी विखारी टिका केली त्यांच्या कडे विकासाचा मुद्दा नव्हता जनतेने त्यांना त्यांची जागा बरोबर दाखवली. आपले उमेदवार सुशिक्षित जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे आहेत.

यावेळी पंधरा मताधिक्याने निवडून आलेले
नगरसेवक उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळीसुमन शेळके, श्रीराम डोके, अँड प्रविण सानप, पोपट राळेभात, सिमा रवींद्र कुलकर्णी, विकी घायतडक, प्रांजल अमित चिंतामणी, हर्षद काळे नंदा प्रविण होळकर, मोहन पवार, वैशाली अर्जुन म्हेत्रे, तात्याराम पोकळे, संजय काशिद, आशाबाई टकले, जया संतोष गव्हाळे उपस्थित होते. यावेळी पराभूत उमेदवारांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बापुराव ढवळे, शेखर खरमरे, सभापती शरद कार्ले, डॉ. भगवानराव मुरूमकर, अजय काशिद, प्रविण घुले, कैलास शेवाळे, संजिवनी पाटील, संपत बावडकर, अनिल गदादे, संतोष म्हेत्रे, पांडुरंग उबाळे, रवी सुरवसे यांनी मनोगते व्यक्त केले.

नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, नगराध्यक्ष हे मिरवण्यासाठी पद नाही तर जनतेचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राजकारण सेवेसाठी हे शिंदे साहेबांनी दाखवून दिले आहे.योगायोग असा आहे की प्रांजल चिंतामणी यांच्या आजे सासू ग्रामपंचायत सदस्या असताना 1974 भुतवडा तलावातून जामखेड करांना पाणी मिळाले ते आजपर्यंत सुरू आहे आता प्रांजल चिंतामणी यांच्या काळात उजणीतून पाणी मिळणार आहे.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, विजयी उमेदवारांचा सत्कार तर पराभूत उमेदवारांना मायेची शाल घातली आपला कोण आहे हे जामखेड करांनी ओळखले आहे, नगरपरिषद घवघवीत यशामुळे आपली जबाबदारी वाढली आहे आता सभापती चा सन्मान महाराष्ट्रात वाढेल असे काम करावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here