जामखेड येथील कालिका पोदार स्कूलला बेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम इन स्कूल, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणं ही शाळेच्या समर्पण, मेहनत आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचं प्रतीक मानलं जात आहे. ईएसएफई संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेला स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ हा पुरस्कार सोहळा दि. १२ डिसेंबर रोजी मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को (बॉम्बे एक्झिबिशन सेंटर) येथे पार पडला.
ईएसएफई संस्थेच्या वतीने आयोजित स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ मध्ये कालिका पोदार शाळेचे नामांकन झालं होतं. संस्थेच्या एका टिमने प्रत्यक्ष पाहणी करुन, गेल्या सात वर्षांचा या शाळेचा आढावा घेऊन,पडताळणी करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील २०० शाळांची नामांकने आली होती. कार्यक्रमास शाळेचे प्रिन्सिपल कुंदन नेमाडे सरव, अविनाश खेडकर, उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, या पुरस्काराचे खरे मानकरी म्हणजे शाळेचे संस्थापक, शिक्षकव शिक्षेकतर वर्ग व विद्यार्थी असन,त्यांच्याच परिश्रमाचे हे फळ आहे. या उतुंग यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून शाळेचे अभिनंदन होत आहे.
ESFE व द टाईम्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेला स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ हा १२ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को (बॉम्बे एक्झिबिशन सेंटर) येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
ESFE आणि द टाइम्स ऑफ इंडियाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ मध्ये या शाळेचे नामांकन झालं होतं यांच्या एका टिमने प्रत्यक्ष पाहणी करुन, गेल्या सात वर्षाचा या शाळेचा आढावा घेऊन,पडताळणी करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील २०० शाळांची नामांकने आली होती. यामध्ये ले- लद्दाख, दिल्ली, अंदमान-निकोबार, पंजाब, हरियाणा, काश्मीर, पासून ते कर्नाटक ,आंध्रप्रदेश, केरळ पर्यंतच्या अनेक शाळांचा समावेश होता.