राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारीयांना मातृशोक
सुरेखाबाई सुभाषलालजी कोठारी यांचे निधन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या मातोश्री सुरेखाबाई सुभाषलालजी कोठारी वय ९० वर्षे यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान पुणे येथे आज सायंकाळी दु:खद निधन झाले यामुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष कोठारी यांच्या त्या पत्नी होत्या. वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकालाने व आजारामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि. १६ /१२ /२०२५ रोजी सकाळी ११ वा. तपनेश्वर अमरधाम, जामखेड येथे होईल येथे होईल.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी यांच्या त्या चुलती होत्या.