स्वच्छ सुंदर व हाताला रोजगार देणाऱ्या जामखेड साठी भाजपाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार – प्रा. मधुकर राळेभात जामखेड शहर गुंडांचे शहर बनत चालल्याची खंत
स्वच्छ सुंदर व हाताला रोजगार देणाऱ्या जामखेड साठी भाजपाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार – प्रा. मधुकर राळेभात
जामखेड शहर गुंडांचे शहर बनत चालल्याची खंत
जामखेड सध्या सुधारीत शहर नाही तर गुंडाचे शहर बनत चालले आहे. जामखेड शहर भकासाकडे घेऊन जाणारे नाही तर विकासाकडे घेऊन जायचे शहर बनवायचे आहे. जामखेडला संदर जामखेड सोबत हाताला रोजगार देणारं जामखेड बनवायचे यासाठी मी जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आसुन पक्षाने संधी दिल्यास जामखेड नगरपरिषदेची निवडणूक लढविणार आहे अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले आहे.
गुरवार दि 6 नोव्हेंबर रोजी सकाळी जेष्ठ नेते मधुकर आबा राळेभात यांची पत्रकार परिषद निवडणुकीच्या पार्शवभूमीवर संपन्न झाली. यावेळी पत्रकार बांधवांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मधुकर (आबा) म्हणाले कि, जामखेड शहर स्वछ सुंदर करण्यासाठी, जामखेडचा विकास करण्यासाठी सत्तेची गरज आहे. सत्तेतील माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. जामखेड शहरात गुंडागर्दी वाढली आहे ती थांबवली पाहिजे जामखेडला कुठलीही एमआयडीसी किंवा इंडस्ट्री नाही त्यामुळे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे.
यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मोठमोठे कॉम्प्लेक्स झाले पाहिजेत त्यामध्ये मॉल, सांस्कृतिक भवन झालं पाहिजे आणि जामखेड बदनाम झालंय असं अजिबात नाही कशानाही शहर बदनाम होत नाही व्यापार पेठ जामखेडची मोठी आहे त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून सुंदर शहर व स्वछ शहर झालं पाहिजे आणि जामखेड कर म्हणून प्रत्येक नागरिकांनी माझं जामखेडकर म्हणून पाहिलं पाहिजे.
जामखेडसाठी आता काय तरी करायची वेळ आली आहे आम्ही जेष्ठ नेते म्हणून काम करत आहोत परंतु विकास जामखेडचा झाला नाही आता मात्र जामखेड हरित करायचं असेल तर पर्याय नाही पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती मी स्वीकारणार आहे.
नगर परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजना उपलब्ध करून देणार आहे. दहा वर्षांपासून शेतकरी योजनांपासून वंचित असून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न होणार आहे.
हिंदू-मुस्लिम समाजात ऐक्य राहावे, शांतता नांदावी हा आमचा विचार आहे. शांतिनाथ महाराज व इमामशहा वली बाबांच्या संजीवन समाधीमुळे जामखेड हे धार्मिक एकतेचे प्रतीक आहे. विद्यार्थींसाठी उच्च दर्जाचे शिक्षण संकुल उभारून विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. शैक्षणिक विकास झाला की शहराचा सामाजिक आणि व्यावसायिक स्तर उंचावतो असे देखील प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
माझीही पत्नी बीपीएड आहे सुशिक्षित आहे मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाने दिली संधी तर त्याच सोन करील, सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला जाईल त्यामुळे विकास आता दूर नाही आपण सर्व जण मिळून जामखेड शहर स्वछ सुंदर हरित करू असे अवाहन केले आहे.
यावेळी नगरसेवक दिगंबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव ढेपे, पवन राळेभात, अमित जाधव, पिंटूशेठ बोरा, गणेश राळेभात, उद्धव हुलगुंडे, अशोक गायकवाड, राजू वारे, ॲड अमृत राळेभात, विलास मोरे, वैभव काटकर, सुरज राळेभात, लखन राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.