माझ्या पेक्षा माझ्या वडीलांनी खुप गरीबीतुन कष्ट केले आहे. वडीलांनी संघर्षातून व स्वतःच्या हिमतीने खुप मोठे नाव कमावले आहे. मुलगा म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या संघर्षाची जाण ठेऊन मी येथुन पुढे सामाजिक काम करीत लोकांचे प्रश्न सोडवणार आहे आसे आश्वासन साकत जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार पै.चिराग मंगेश आजबे यांनी व्यक्त केला.
जिल्हापरिषद साकत गटाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पै. चिराग (भैय्या) आजबे व मंगेश (दादा) आजबे यांनी आपल्या गटातील गावभेटी दौरा सुरु केला आहे. आज मंगळवार दि 4 नोव्हेंबर रोजी धोंडपारगाव येथे गावभेटी दौरा केला. विशेष म्हणजे या दौर्याला धोंडपारगाव येथील ग्रामस्थांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती लावली होती.
यावेळी इच्छुक उमेदवार चिराग आजबे यांनी धोंडपारगाव येथील नागनाथाचे दर्शन घेतले व गावभेटीला सुरवात केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की शेतकरी व कष्टकरी लोकांचे प्रश्न जाणुन घेणारा नेता म्हणजे मंगेश (दादा) आजबे आहेत. कधीही संकटकाळी आपण त्यांना हाक मारली की लगेच लोकांच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद साकत गटातून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणार आहोत आसे आश्वासन उपस्थित गावकर्यांनी दिले.
यावेळी मंगेश (दादा) आजबे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. रोहीत पवार यांच्या पक्षाकडून माझा मुलगा चिराग आजबे हा साकत जिल्हा परिषद गटातून निवडणूकीसाठी इच्छुक आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मुलाला निवडणूकीत का उतरवले आहे. याचे कारण म्हणजे मला तीन अपत्य असल्याने उभे रहाता येत नाही. म्हणून मी तरुण तडफदार असा व सामाजिक जाण असलेल्या माझ्या मुलाला निवडणुकीत उभे करणार आहे. विशेष म्हणजे आम्ही दोघे मिळून लोकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
आज धोंडपारगाव येथे दौर्याला तुम्ही सर्व उपस्थित राहीले, तुम्ही आमचा सन्मान केला त्याबद्दल मंगेश (दादा) आजबे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच येणार्या काळात तुम्ही माणसात रहाणारा माणुस ओळखून त्यांच्या मागे रहा मी दहा वर्षापासून शेतकर्यांची सेवा केली आहे त्यामुळे तुम्ही देखील माझ्या पाठीशी उभे रहाल आशी अपेक्षा मंगेश आजबे यांनी बोलताना व्यक्त केली.
चौकट
मंगेश (दादा) आजबे हे आपल्या मुलासाठी निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी अत्तापर्यंत झिक्रि, राजेवाडी, सावरगाव व धोंडपारगाव येथे गावभेटी दौरै सुरु केले आहेत. त्यांच्या या दौऱ्याला आज धोंडपारगाव येथिल ग्रामस्थांनी प्रचंड असा मोठा प्रतिसाद दिला. त्या बद्दल पै. चिराग आजबे व मंगेश आजबे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी धोंडपारगाव येथील शाळा व अंगणवाडी येथिल चिमुकल्यांना चिराग आजबे यांच्या कडुन खाऊ वाटप केला. यावेळी चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.