जामखेड सौताडा महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. पुलाचे काम व खराब रस्ता यामुळे वाहने साकत मार्गी ये जा करतात. सध्या साकत रस्ताही खुपच खराब झाला आहे. खड्डेच खड्डे आहेत. याच खड्ड्यामुळे सावरगाव येथील ढवळे वस्तूवरील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो तरी वाहनचालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. वाहने खिळखिळी तर वाहनचालकांचे मनके खिळखिळी झाली आहेत. ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच फुलांची दुरूस्ती करावी अशी मागणी युवा कार्यकर्ते हरीभाऊ मुरूमकर यांची केली आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाहीयातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी ट्रक मधील पाईप रस्त्यावर पडले होते. तसेच घाटात अनेक अपघात झाले आहेत.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
एका वर्षात साकत घाटात दहा ते बारा अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या खड्डे भुजवावेत अशी मागणी होत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच साकत फाटा ते धोत्री पर्यंत रस्त्यावर अनेक झाडांचे फाटे रस्त्यावर आलेली आहेत. त्याची छाटणी करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आशी मागणीहोत आहे.