जामखेड न्युज——-
जामखेडमध्ये भाजपाची निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी
तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने जम्बो कार्यकारिणी जाहीर
सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ग्रामीण सह शहराची सर्व समावेशक जम्बो कार्यकारिणी जाहीर करत सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण मंडलाध्यक्ष पदी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच पिंपरखेड येथील हॅट्रिक सरपंच बापुराव ढवळे व शहरमंडलाध्यक्ष पदी संजय काशिद यांची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही अध्यक्ष आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून घवघवीत यश संपादन करतील अशीच चर्चा सध्या सगळीकडे आहे. आम्ही शिंदे साहेबांचा विश्वास निवडणूकीत विजय संपादन करून मिळवू असे ढवळे व काशिद यांनी सांगितले.
यानुसार दोन्ही अध्यक्षांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.
जामखेड तालुका ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे
तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे हे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू आहेत तसेच ते पिंपरखेड ग्रामपंचायत चे सलग तीन वेळा सरपंच राहिलेले आहेत. तरुणांमध्ये मोठा चाहतावर्ग त्यांचा आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र पक्षांना बरोबर घेत घवघवीत यश संपादन करू असे सांगितले.

जवळा जिल्हा परिषद गट ओबीसी साठी राखीव आहे. या गटावर बापुराव ढवळे यांनी दावेदारी केली आहे. नेमके तिकीट कोणाला मिळते हे येणारा काळच ठरवेल.
शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते जामखेड शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणून काम पाहत होते. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे देवेंद्र फडणवीस व प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ते सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. आपल्या जगदंब प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवितात. त्यांच्या निवडीमुळे शहरातील तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे.







