Friday, February 13, 2026
Home राजकारण कुस्तीच्या फडातून पै. चिराग आजबे राजकारणाच्या फडात उतरणार वडिलांच्या जनसंपर्काच्या बळावर...

कुस्तीच्या फडातून पै. चिराग आजबे राजकारणाच्या फडात उतरणार वडिलांच्या जनसंपर्काच्या बळावर साकत गटातून जिल्हापरिषद निवडूक लढविणार

0
818

जामखेड न्युज—–

कुस्तीच्या फडातून पै. चिराग आजबे राजकारणाच्या फडात उतरणार

वडिलांच्या जनसंपर्काच्या बळावर साकत गटातून जिल्हापरिषद निवडूक लढविणार

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून पक्षाकडे तिकिटासाठी प्रयत्न करताना उमेदवार दिसून येत आहेत. आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जात आहे. साकत गटातून पै. चिराग आजबे हे कुस्ती च्या फडातून थेट राजकारणात साकत गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढविणार आहोत असे सांगितले जात आहे.

आगामी जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. साकत गट सर्वसाधारण म्हणून जाहीर झाला असल्याने निवडणुका रंगतदार होणार आहेत. सर्वच पक्षांनी रणसंग्रामाची तयारी सुरू केली असून साकत गटातून जिल्हा परिषद गटात नवा चेहरा चर्चेत येत असून राष्ट्रवादीचे नेते मंगेश आजबे यांचे चिरंजीव पै.चिराग आजबे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

कुस्तीच्या फडातूनथेट राजकारणाचा मैदानात त्यांनी प्रवेश केला असून गावोगावी कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा त्यांना लाभत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट असून खर्डा, साकत गट सर्वसाधारण तर जवळा गट ओबीसी महिला राखीव पडला असून प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी हालचाली वाढविल्या आहेत.

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या व नव्याने झालेल्या साकत जिल्हा परिषद गटातून अनेक चेहरे समोर येत आहेत. यातच चिराग आजबे यांच्या माध्यमातून युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्याचे वडील मंगेश आजबे यांचा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास सर्वच गावात दांडगा जनसंपर्क आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रशांवर मंगेश आजबे यांनी आंदोलने केली आहेत. मराठा समन्वयक म्हणूनही त्यांनी मोठं काम तालुक्यात केले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत मंगेश आजबे यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होता. आजबे यांनी तालुक्यात संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

चौकट
साकत जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सभापती संजय वराट, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, मंगेश आजबे यांचे चिरंजीव पै. चिराग आजबे, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, हे इच्छूक आहेत तर भाजपाकडून माजी सभापती
डॉ भगवानराव मुरूमकर, अजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले हे इच्छूक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!