जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शांतता कमिटीच्या बैठकीत नागपंचमी सणामुळे शुक्रवारी तर शनिवारी रविवारी जनता कर्फ्यू यामुळे सलग तीन दिवस बाजारपेठ बंदला जामखेड शहरातील व्यापारी आसोशियनने कडाडून विरोध केला व आम्ही तीन दिवस दुकाने बंद ठेवणार नाहीत शुक्रवारी दुकाने सुरूच ठेवणार शनिवार व रविवार चा जनता कर्फ्यू पाळू पण शुक्रवारी दुकाने उघडेच ठेवू असा निर्धार व्यापारी आसोशियनने आज नायब तहसीलदार राजेंद्र लाड यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले एक तर कोरोणामुळे गेली पंधरा सोळा महिन्यापासून व्यापारी होरपळलेला आहे व्यापाऱ्यांना लाईट बिल चुकत नाही नोकरांचा पगार चुकत नाही जागेचे भाडे चुकत नाही आणि बँकेचे हप्ते वेळेवर जात नाही याकरता प्रशासनाने व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेताना व्यापार्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा शुक्रवारी आम्ही बंद ठेवणार नाहीत.
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी आम्ही दुकाने बंद ठेवणार नाहीत व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला कळवावे
जामखेड शहरातील तीन दिवस दुकाने बंद चा निर्णय चुकीचा असल्याने शनिवार रविवार बंद ठेवावे शुक्रवारी दुकाने उघडी ठेवावे असे निवेदन जामखेड येथील व्यापारी संघटनांनी जामखेड तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून राजेंद्र लाड यांच्याकडे दिले यावेळी नगरसेवक आमितशेठ, चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रदीप टापरे, आनंद गुगळे, कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय कटारिया, मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप , ऋतुराज फुटाणे, अभय कासवा, सागर आष्टेकर, शरद शिंगवी, अभय शिंगवी, मंगेश बेदमुथा, बाळासाहेब खैरे,अनुराग गुगळे, पंकज ढाळे, विजय कुलथे तुषार कुकरेजा, प्रशांत आरोरा, उमेश नगरे, राजु टेकाळे आदी उपस्थित होते.