जामखेडमध्ये कलाकेंद्रात तोडफोड करून दहशत निर्माण करत खंडणी मागितल्याप्रकरणी अक्षय (चिंग्या) मोरे सह चार जणांवर गुन्हा दाखल
हातात कोयता घेत दर महिन्याला एक लाख रुपये खंडणी देण्यास सांग अन्यथा आम्ही थिएटर चालू देणार नाहीत असे म्हणत टेबल, खुर्च्या, स्कुटीची तोडफोड करत कलाकेंद्रात आरोपी गुंड अक्षय (चिंग्या) मोरे याने आपल्या साथीदारांसह दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी व नृत्यकाम करणाऱ्या मुलींची छेडछाड करत अश्लिल वर्तन केले. या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रविवार दि. ५ आक्टोबर रोजी रेणुका कलाकेंद्र, मोहा ता. जामखेड येथे आरोपी अक्षय मोरे (चिंग्या) पुर्ण नाव माहित नाही रा. जामखेड जि. अहिल्यानगर, शुभम लोखंडे, (पुर्ण नाव माहित नाही), सतिश टकले (पुर्ण नाव माहित नाही), नागेश रेडेकर (पुर्ण नाव माहित नाही) रा. तिघेही आष्टी जि. बीड, असे एकुण चारजण येथे आले व दरमहा एक लाख रुपये देण्यास सांगा अन्यथा आम्ही थिएटर चालू देणार नाहीत. हातातील कोयत्याने टेबल खुर्च्या मोडतोड करत कलाकेंद्रात दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी व इतर नृत्यांगना यांची छेडछाड केली. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ५ आक्टोबर रोजी सायंकाळी पावने नऊच्या आसपास आरोपी हे रेणुका सांस्कृतीक कला केंद्र मोहा ता. जामखेड जि. अहिल्यानगर येथे आले व त्यांनी त्यांचे हातात कोयता घेवुन दहशत करुन थिएटरचे मालक अनिल पवार व त्यांचे मुले परसु पवार, मोहीत पवार, यांना आम्हाला दर महिण्याला एक लाख रुपये आणुन द्यायला सांगा नाही तर आम्ही थिएटर चालु देणार नाही. तसेच त्यांनी त्यांचे हातातील कोयत्याने थिएटर मधील खुर्च्या, टेबल व माझी दोन चाकी मोटार सायकल स्कुटीची तोडफोड केली. व फिर्यादी सोबत नृत्यकाम करणारे मुलींची छेडछाड केली. त्यावेळी फिर्यादीमध्ये आल्या असता एका आरोपीने फिर्यादीचा विनयभंग करुन ढकलुन दिले. व फिर्यादी व त्यांचे बैठकीतील मुलींशी अश्लील वर्तन केले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवळकर करत आहेत.
जामखेड येथील कलाकेंद्रावर आनेक वेळा बाहेरील गुंडानकडुन वेळोवेळी नृत्यांगना यांना छेडछाडीचा त्रास होतो. तसेच तक्रार करायला गेल्यावर पुन्हा दुसर्या वेळी येऊन दमदाटी करतात. या कलाकेंद्रातील नृत्यांगना यांच्यावर आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. जर कलाकेंद्रावर नृत्यकाम करायला आम्ही गेलो नाहीतर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी प्रतिक्रिया कलाकेंद्राती एका नृत्यांगना यांनी दिली.
चौकट
या घटनेतील आरोपी अक्षय ऊर्फ (चिंग्या) मोरे यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला आनेक गुन्हे दाखल आहेत. मागील एका दुहेरी हत्याकांडातील अल्पवयीन आरोपी होता. तसेच एक हाफ मर्डर, कलाकेंद्र फोडण्याचे, खंडणी मागणे असे दोन गुन्हे, तसेच पाटोदा येथे गोळीबार व अनेक वेळा तडीपारच्या कारवाई देखील अक्षय उर्फ चिंग्या मोरे याच्यावर करण्यात आल्या आहेत.