जामखेड तालुका बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचा फक्त दर बुधवारीच दुकाने बंद ठेवण्याचा एकमुखी ठराव
जामखेड तालुक्यातील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे सर्व सदस्यांनी एकत्र येऊन फक्त दर बुधवारीच दुकाने बंद ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला यामुळे आता कोणत्याही संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा बंद असेल तरीही दुकाने बंद ठेवली जाणार नाहीत. असे सर्वानुमते ठरले.
मंगळवारी सायंकाळी सर्व असोसिएशन च्या सदस्यांनी एकत्रित येत अध्यक्ष म्हणून मंगेश (दादा)आजबे तसेच उपाध्यक्ष लहुशेठ डोंगरे तर सचिव म्हणून मोहन पवार, खजिनदार निखिल भंडारी,सल्लागार परसूराम धरणे अशा प्रकारे बिनविरोध सर्वानुमते निवडी केल्या यावेळी आण्णा मांजरे, दादा चिंचकर, शांतीलाल (शांतू) वाघ, संभाजी पवार, सुरज चटेकर, नाना आजबे, महावीर कुंजीर, अभिषेक रेडे, बजरंग रेडे, सोनू वाघ, गोटु रसाळ, करण लोडा,अजीत वराट, अनिल पितळे, बळीराम मिघरे, तात्या भिसे, विवेक जरे, सुरेश चौधरी, मोसम बोगावत, दयानंद आगलावे, रमेश काळे, किसन घपटे, ज्ञानेश्वर शिंदे आदी व्यापारी सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश आजबे म्हणाले की, सध्या जामखेड शहरातील व्यापारी भयभीत अवस्थेत आहेत. नेहमीच कोणत्या तरी संघटनेचा, राजकीय पक्षाचा बंद पुकारला जातो यामुळे व्यापाऱ्यांची इच्छा नसताना दुकाने बंद ठेवावी लागतात. एखाद्या व्यापाऱ्यांने दुकान उघडले तर दुकानावर दगडफेक केली जाते यामुळे भीतीपोटी व्यापारी दुकाने बंद ठेवतात.
आता असोसिएशन च्या माध्यमातून कोणत्याही व्यापाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. आम्ही फक्त बुधवारीच दुकाने बंद ठेवू इतर वेळी कोणाचाही बंद असला तरी आम्ही दुकाने बंद ठेवणार नाहीत.
जामखेड तालुका बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनच्या या निर्णयाचे इतर व्यापारी व व्यावसायिक यांनीही स्वागत केले आहे.
यावेळी अध्यक्ष मंगेश आजबे, उपाध्यक्ष मोहन पवार यांच्या सह अनेक सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व फक्त दर बुधवारीच दुकाने बंद ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला.