नगराध्यक्ष पदासाठी आज आरक्षण सोडत, सोडतीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष

0
107

जामखेड न्युज—–

नगराध्यक्ष पदासाठी आज आरक्षण सोडत, सोडतीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत ही आज सोमवारी (दि. 6 ऑक्टोबर) मुंबईत निघणार आहे. नगरपंचायतींच्या इच्छुकांना हुरहुर लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे विकासकामे रखडली आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही कामे होत नाहीत. त्यामुळे निवडणुका कधी होतील याकडे इच्छुकांचे लक्ष लागून होते. आजच्या आरक्षण सोडतीची चर्चा चौका चौकात व नाक्यावर सुरू आहे. हेच आरक्षण निघणार अशी अटकळी बांधल्या जात आहेत.

राज्यातील २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव प्रत्येक पक्षाला केवळ दोन प्रतिनिधी पाठवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांच्या राजकीय नेत्यांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे. 

आता आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी दि. 6 ऑक्टोबर तर नगरसेवक पदासांठीचे आरक्षण सोडत ही बुधवार दि. 8 ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना काढले आहेत. नगरसेवकांच्या आरक्षण सोडत प्रक्रियेत नागरिकांचा मागास, अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

प्रारूप आरक्षणावर 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी 17 ऑक्टोंबरपर्यंत विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत. प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांचा विचार करून विभागीय आयुक्त 24 ऑक्टोबरपर्यंत नगरसेवकांचे आरक्षण अंतिम करणार आहेत. त्यानंतर संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी 28 ऑक्टोबरपर्यंत अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत.
थेट जनतेतून नगराध्यक्ष

थेट जनतेतून नगराध्यक्ष

नगराध्यक्ष पदांच्या निवडीच्या पद्धतीतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. २०१९ नंतर नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांच्या बहुमताने केली जात होती. मात्र आता पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यामुळे मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असून निवडणुकांतील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here