श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज श्री दुर्गामाता महादौड, रावण दहन व भव्य शस्त्रपुजन

0
237

जामखेड न्युज—–

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज श्री दुर्गामाता महादौड, रावण दहन व भव्य शस्त्रपुजन

पुण्यश्लोक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य व्रत आदरणीय श्री.संभाजीराव भिडे गुरुजींच्या विचाराने प्रेरीत होवुन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गेले चाळीस वर्षापासून महाराष्ट्रात घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत दुर्गामाता दौड हा उपक्रम अवघा हिंदु समाज भगव्या झेंड्याखाली एकत्र यावा या उद्देशाने करत असते.

गेल्या नऊ दिवसांपासून आपल्या जामखेड शहरात दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री दुर्गामाता दौड होत आहे. दररोज पहाटे ठिक ५:१५ वा सर्व धारकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने शनि मारूती मंदीर छत्रपती श्री शिवाजी महाराज पेठ या ठिकाणी जमतात. डोक्यावर वारकरी टोपी किंवा भगवे फेटे घालुन हातात शस्त्र घेऊन आई भावानी चा जयजयकार करत या राष्ट्राला गत वैभव प्राप्त व्हावं आणि शिवछत्रपतींनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याच स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून भावानी मातेला मागनं मागतात.

देव, देश व धर्माचे गीत गात अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने लोहारदेवी या ठिकाणी जाऊन देवीची आरती करतात व प्रसाद वाटप करून दुर्गामाता दौडीचा समारोप होतो. असा हा असा नित्यक्रम दररोज सुरू असतो यामध्ये लहान मुले तसेच वयोवृद्ध शिवभक्त देखील सामिल होतात.

हिंदु धर्माचं क्षात्रतेज परजुन विजयादशमी ह्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे अठरापगड धारकरी मराठे शस्त्रपूजन करुन सिमोल्लंघनासाठी निघत असतात. महाराष्ट्राची ही धारकरी परंपरा लक्षात घेऊन श्री दुर्गामाता दौडचा समारोप “महादौड” या कार्यक्रमाने तसेच रावण दहन व भव्य शस्त्रपुजन या कार्यक्रमाने होणार आहे.

हे सर्व कार्यक्रम गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हणजेच विजयादशमी (दसरा) या दिवशी लोहार देवी याठिकाणी सायंकाळी ठिक ७ वा. होणार आहे. महादौडची सुरुवात दुर्गामाता मंदीर बाजारतळ येथुन सायं ५:०० वाजता निघेल.

तरी जामखेड शहरातील समस्त ग्रामस्थ शिवभक्त,धारकरी व हिंदुबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे श्री.पांडुराजे भोसले यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here