जामखेड परिसरातील दाताच्या व्याधीग्रस्तांसाठी साधना नावाचे साधन उपलब्ध झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार होणार आहेत त्यामुळे आता नगर पुणे येथे जाण्याची आवश्यकता नाही. येथे वेदनारहित दात दुरूस्त व्हावेत अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केली.
जामखेड शहरात बीड रोडवर सरकारी दवाखान्याच्या समोर अत्याधुनिक साधनांनी युक्त साधना दातांचा दवाखान्याचा शुभारंभ सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते तर पांडुरंग शास्त्री देशमुख यांच्या आशिर्वादाने विविध मान्यवरांच्या हस्ते भव्य उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, पांडुरंग शास्त्र देशमुख, उद्योगपती रमेश गुगळे, प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, मनोज कुलकर्णी, पोपट (नाना) राळेभात, अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, तात्याराम पोकळे, प्रदिप टाफरे, पवन राळेभात, निलेश तवटे, महादेव डुचे, राहुल उगले, सागर अंदुरे, धनंजय कार्ले, संजय डोके, मनोज कुलथे, भोगे, आण्णा विटकर, विनायक राऊत, मोहन पवार, राहुल उगले, तुषार बोथरा, योगेश देशमुख, प्रविण चोरडिया, डॉ. विठ्ठल राळेभात, गणेश डोंगरे, दिग्विजय देशपांडेयांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, आगोदर सर्व आजारावर एकच डॉक्टर असायचे आता अवयव निहाय डॉ. जामखेड मध्येउपलब्ध आहेत. अत्याधुनिक साधनांनी युक्त साधना दातांचा दवाखाना सुरू झाला आहे. त्यामुळे आता नगर पुणे येथे जाण्याची आवश्यकता नाही. डॉ. श्रुती देशमुख यांनी वेदनारहित दात दुरूस्त करावेत असे सांगितले. तसेच दवाखान्यासाठी व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. श्रुती रोहित देशमुख व रोहित देशमुख यांच्या साधना दातांचा दवाखाना येथे उपलब्ध सुविधा
चांदी/सिमेंट बसवणे, रूट कँनाँल ट्रिटमेंट, फिक्स दात बसवणे, संपूर्ण कवळी बसवणे, हिरड्यावरील उपचार, स्माईल डिझायनिंग, लहान मुलांच्या दातावरील उपचार, मशीनद्वारे दात साफ करणे, अक्कल दाढेवरील उपचार, तोंडाची दुर्गंधी, तोंडावरील चट्टयांवर उपचार, वेडेवाकडे दात सरळ करणे, डिजिटल एक्स- रे सुविधा यासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन देशमुख तर आभार डॉ श्रुती देशमुख यांनी मानले.