राजकारणाबरोबरच समाजकारणात अग्रेसर असलेले नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने शहरातील महिलांसाठी गेल्या अकरा वर्षापासून मोफत मोहटादेवी दर्शन हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे याही वर्षी सुमारे पन्नास साठ गाड्या मधुन पाचशे महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन घडवून आणले.
जामखेड नगरपरिषदेचे कार्यकुशल नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शारदिय नवरात्र उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले असून त्या अंतर्गतच आज दि. २४ सप्टेंबर रोजी ५० ते ६० गाड्यांमधुन महिलांनी मोहटादेवी दर्शनासाठी प्रस्तान केले आहे.
जामखेड शहरातील नगर रोडवरील ना. प्रा. राम शिंदे यांचे कार्यालयासमोर नारळ फोडून या गाड्यांची मोहटादेवी गडाकडे रवानगी करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक अमित चिंतामणी, बाजार समिती उपसभापती नंदकुमार गोरे, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, संजय राऊत, प्रविण चोरडिया, संचालक विष्णू भोंडवे, डॉ. अल्ताफ शेख, ॲड. प्रवीण सानप, तात्याराम पोकळे,आनंद ढवळे,गणेश काळे, नारायण जायभाय, पोपट राळेभात, उमेश देशमुख, आदी मान्यवरांसह भाविक भक्त व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने होत असलेल्या शारदिय नवरात्र उत्सवाचे हे ११ वे वर्षे असून जामखेड शहरातील महिला भगिनींसाठी नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमाची धुरा अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी देशमुख गडी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मोहटादेवी दर्शनासाठी महिलांसोबत प्रत्थान केले.
एकंदरच नगरसेवक अमित चिंतामणी व प्रांजलताई चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची एक अनोखी पर्वणीच ठरणार आहे.
महिला भगिनींनी दि. २५ सप्टेंबर ते दि. २९ सप्टेंबर रोजी दरम्यान होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.