आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या, मोहाला बळी पडू नका – आरटीओ अधिकारी प्रियंका चौथे ल.ना.होशिंग विद्यालयात वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन

0
558

जामखेड न्युज—–

आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या, मोहाला बळी पडू नका – आरटीओ अधिकारी प्रियंका चौथे

ल.ना.होशिंग विद्यालयात वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन

भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य राखणे आवश्यक आहे. आपल्या आईवडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी या वयात भरपूर मेहनत घ्यावी. कोणत्याही मोहाला बळी पडू नये. आपली सुरक्षितता आपणच राखावी असे मुलींना आवाहन
आरटीओ अधिकारी प्रियंका चौथे यांनी केले.

बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती प्रियंका चौथे मॅडम आरटीओ ऑफिसर अहिल्यानगर, चेतन दासनूर आरटीओ ऑफिसर अहिल्यानगर, भिमराव जगताप पोलीस कर्मचारी, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे, वरिष्ठ लिपिक कोळी भाऊसाहेब,ज्येष्ठ शिक्षक भरत लहाने कलाशिक्षक राऊत मुकुंद, समारंभ विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे, श्रीमती जगदाळे मॅडम यांच्या सह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने घेण्यात आला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्रीमती प्रियंका चौथे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकी विषयीचे नियम, अपघात, सिग्नल, गतिरोधक इ. विषयी सविस्तर मार्गदर्शन करून मुलींनीही स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.

चेतन दासनूर साहेब यांनी ही वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. विद्यार्थी दशेत आपण अभ्यास करून आपलं नाव उज्वल केले पाहिजे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भारताचे जबाबदार नागरिक असून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी गाडी चालवू नये. अपघात झाला तर नाहक आई वडिलांना दंड आणि सजा होऊ शकते. घरच्या सदस्यांनी व नातेवाईक मित्र परिवार यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून द्यावे. डबल, ट्रिपल सीट गाडी चालवू नये. शक्यतो सर्व मुले आणि मुली यांनी शालेय जीवनात सायकल वापरावी.


कमी वयात तुम्ही मोटरसायकल चालवत असाल तर तुमची मोटारसायकल जप्त केली जाऊ शकते याची विद्यार्थी व पालकांनी काळजी घ्यावी. शाळेत देखील शिस्तपालन करून आपले ध्येय ठरवून उज्ज्वल भविष्य साध्य करावे असे आवाहन केले.
प्राचार्य श्री बाळासाहेब पारखे यांनी जो विद्यार्थी नियमाचे पालन करेल सर्वच बाबतीत त्याला अडचण येणार नाही.

कार्यक्रमासाठी समारंभ नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे,साई भोसले,स्वप्नील जाधव,किशोर कुलकर्णी, हनुमंत वराट यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले.
आभार प्रदर्शन भरत लहाने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here