नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक आरोपीस खर्डा पोलीसांनी ठोकल्या बेड्या

0
1425

जामखेड न्युज—–

नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक

आरोपीस खर्डा पोलीसांनी ठोकल्या बेड्या

 

तहसील कार्यालयात लिपीक या पदावर नोकरी लावतो म्हणुन तेथेच शिपाई म्हणुन काम करणा-या आरोपी ने त्याच्या मोठ मोठ्या अधिकारी यांच्या समवेत चांगल्या ओळखी असल्याचे सांगुण फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांच्याकडुन पाच लाख रुपये घेतले नोकरीचे आमिष दाखवुन 5 लाखाली फसवणुक करणा-या फरार आरोपीस 2 वर्षानंतर खर्डा पोलीसांनी केले नवी मुंबई येथुन अटक केली आहे.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की , 2017 मध्ये खर्डा येथील तक्रारदार यांच्या मुलाला माणगाव जि रायगड येथे तहसील कार्यालयात लिपीक या पदावर नोकरी लावतो म्हणुन तेथेच शिपाई म्हणुन काम करणा-या आरोपी ने त्याच्या मोठ मोठ्या अधिकारी यांच्या समवेत चांगल्या ओळखी असल्याचे सांगुण फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांच्याकडुन पाच लाख रुपये घेतले व त्यांना माणगाव तसहिल कार्यालय येथील लिपीक पदावर नियुक्त केले बाबतची बनावट आँर्डर तयार करुन फिर्यादीची फसवणुक केली.

याबाबत खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर- 218/2023 भारतीय दंड संहिता कलम 420, 435, 468, 436, 471, 34 प्रमाणे दिनांक 29/12/2023 रोजी आरोपी नामे- मुरलीधर धर्मा नेटके रा.भोंजा ता.परांडा जि.धाराशिव हल्ली रा.CBD, बेलापुर,पनवेल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.गुन्हा दाखल झाले पासुन यातील आरोपी हा फरार होता.

त्याचा वेळोवेळी शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता. सपोनि उज्वलसिंह राजपुत यांनी एक पथक तयार करुन स्वतः पथकात राहुन सदर आरोपीची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवुन गेल्या दोन वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे- मुरलीधर धर्मा नेटके यास नवी मुंबई या ठिकाणावरुन ताब्यात घेतले असुन त्यास पुढील कारवाई करीता खर्डा पोलीस स्टेशन ला आणले असुन पुढील तपास सपोनि उज्वलसिंह राजपुत हे करत आहेत.

सदर ची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रविण लोखंडे यांच्या मार्गदशनाखाली खर्डा पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.उज्वलसिंह राजपुत पो.हवा./संभाजी शेंडे, पोकाँ/ पंडीत हंबर्डे ,पोकॉ/शशी म्हस्के, पोकॉ/अशोक बडे,पोकाँ/बाळु खाडे.यांनी सदर ची कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here