कडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; 30 गावांचा संपर्क तुटला; पुरात अडलेल्या नागरिकांच थेट हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू
आमदार सुरेश धस स्वत: रेस्क्यू साठी व जनतेला दिलासा देण्यासाठी घटनास्थळी
बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीजन्य पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका शेती पिकांसह शेतकऱ्यांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आष्टी तालुक्यातील कडा व आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला असून या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस स्वत: रेस्क्यू साठी धावले व आपतग्रस्त जनतेला बाहेर काढत दिलासा दिला यामुळे आमदार कसा असावा तर आण्णा सारखा अशी चर्चा सर्व सामान्य जनतेमध्ये आहे.
तर कडा शहर जलमय झाले असून शहरात पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून या नागरिकांना हेलिकॉप्टरमधून रेक्स्यु करून सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेक गावं पाण्याच्या पुरामध्ये अडकली आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
दरम्यान आष्टी तालुक्यातील कडा शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाऊस सुरूच असल्याने घराघरात भीतीचं सावट निर्माण झाले असून आई- बापांच्या डोळ्यात काळजी पाहण्यास मिळत आहे.
आष्टी मतदार संघातील कडा येथील पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचे हेलिकॉप्टरच्या साह्याने आमदार सुरेश धस यांच्या मागणीनंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात येत असून त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी नदीच्या पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला. तर काही ठिकाणी जनावर त्याचबरोबर झाड वाहून गेल्याचे पाहायला मिळालेला आहे. यातच संपूर्ण कडा शहर हे जलमय झालं होतं.