जामखेड भाजपाच्या वतीने जिल्हा बँक प्रशासनाचा जाहीर निषेध सभापती प्रा राम शिंदे यांचा फोटो न छापण्याचा जिल्हा बँक प्रशासनाचा खोडसाळपणा

0
899

जामखेड न्युज—–

जामखेड भाजपाच्या वतीने जिल्हा बँक प्रशासनाचा जाहीर निषेध

सभापती प्रा राम शिंदे यांचा फोटो न छापण्याचा जिल्हा बँक प्रशासनाचा खोडसाळपणा

दि अहमदनगर जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवालतून महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे साहेब यांचा फोटो छापला नाही म्हणून भाजपा जामखेड तालुक्याच्या वतीने आज जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

दि अहमदनगर जिल्हा बँकेची स्थापना 1957 साली झाली व 1958 साली सुरवात झाली शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेची ओळख जिल्ह्यात आहे. सोसायटीच्या माध्यमातून चालणारी सहकारतील अग्रगण्य संस्था आहे. आशिया खंडात या बँकेचा नावलौकिक आहे.

मारुतराव घुले पाटील, त्यावेळी असलेले खासदार खा मोतीभाऊ फिरोदया यांनी या बँकेची स्थापना करून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सुरु केली. 

यावेळी मुख्यमंत्री असेलेले यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या बँकेचे उदघाटन त्या साली झाले व त्यांनी देखील समाधान व्यक्त केले होते अशी संस्थेची गरज या जिल्ह्याला होती व ती गरज या माध्यमातून पूर्ण होईल सहकारतील ही बँक नावारूपाला येऊन मोठी बँक म्हणून पुढे आली. 

ही बँक सध्या भाजप च्या ताब्यात आहे. पंतप्रधान मोदींपासून जिल्ह्यातील सर्व आमदारपर्यंत सर्वांचे फोटो या अहलावाला मध्ये आहेत परंतु राज्यपालानंतर येणारे सर्वोच्च पद असणारे विधान परिषदेचे सभापती पद असणारे प्रा राम शिंदे् यांचा फोटो मात्र अहवालतून गायब आहे हा फोटो जाणून बुजून टाळला कि काय…? असा प्रश्न पडला आहे याचा निषेध म्हणून आज भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेसमोर येत काळ्या फिती बांधून बँकेच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष ग्रामीण मंडल बापूराव ढवळे, शहरमंडलाध्यक्ष संजय काशीद, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, उपसभापती नंदकुमार गोरे, माजी सभापती गौतम उतेकर, मनोज कुलकर्णी, संचालक सचिन घुमरे, शरद जगताप, वैजिनाथ पाटील, पांडुरंग उबाळे, उदयसिंह पवार, राहुल चोरगे, महारुद्र महारनवर, गोरख घनवट, चेअरमन उद्धव हूलगुंडे, संचालक , संचालक डॉ. गणेश जगताप,मोहन (मामा) गडदे, नगरसेवक अमित जाधव, तात्याराम पोकळे, मोहन देवकाते, उदयसिंह पवार, डॉ. जयराम खोत, रखमाजी मुंडे, महालिंग कोरे, राजेंद्र ओमासे, चेअरमन अशोक महारनवर, जालिंदर चव्हाण, सुशिल आव्हाड, राहुल चोरगे, डॉ अल्ताब शेख,अजय सातव,भैय्या थोरात, गणेश लटके, श्रीराम डोके, संदीप जायभाय, बाळासाहेब गोपाळघरे, मा. ऋषिकेश नेरकर, राजू गोरे, कल्याण शिंदे, किरण जाधव, मिलिंद देवकर, संजय बेरड, अन्सार पठाण,भारत ढवळे, बाबासाहेब फुलमाळी, पृथ्वीराज भोसले, भारत उगले, मलिकभाई, अंगद गव्हाणे, चेअरमन मगन बहीर, गौतम कोल्हे, विशाल भांडवलकर आदी पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here