पंतप्रधान नरेंद्र मोदीचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार – तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे सेवा पंधरवडा कार्यक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबविणार
पंतप्रधान नरेंद्र मोदीचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार – तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे
सेवा पंधरवडा कार्यक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबविणार
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या ७५ वाढदिवसाचे औचित्य साधत सेवा_परमो_धर्मा : या उक्ती प्रमाणे वंचित शोषित घटकांची सेवा विविध समाज उपयोगी विधायक कामांचे आयोजन करत करणेत येणार आहे. अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष ग्रामीण मंडळ बापुराव ढवळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत देशभरात अनेक समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ सुरू करणार आहेत, या उपक्रमाचा उद्देश हा महिला आणि मुलांसाठी असलेली आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे असणार आहे. हे सर्व समाजोपयोगी कार्यक्रम तालुक्यात प्रभावी पणे राबविण्यात येणार आहेत अशी माहिती ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी दिली.
“सेवा सुशासन संघटनात्मक प्रवास ” या सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन दि17/09/2025 ते दि .02/10/2025 पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. त्यासाठी आज दि 08/09/2025 रोजी जामखेड मंडळ व जामखेड शहर मंडळाची नियोजनाची बेठक आज घेणेत आली त्याप्रसंगी मार्गदर्शन केले.
प्रत्येक अंत्योदय व्यक्तिची सेवा करणे, स्वच्छता हि अंगी बाळगावी, रक्तदान सारखे उपक्रम, विविध आरोग्य शिबिराचे आयोजन, अशा कार्यक्रमाची माहिती दिली विशेष म्हणजे शासकीय पातळीवर पण हा कार्यक्रम अशाच सेवा भावी उपक्रमानी साजरा होणार आहे त्यास भाजप संघटन जोरदार पाठबळ देणार असून त्याबद्दलचे नियोजन दिलीप भालसिंग अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, भाजपा अहिल्यानगर, करत असूम त्याची ही माहिती या बैठकीत दिली बैठकीसाठी मंडळाध्यक्ष, राज्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जामखेडचे प्रभारी चंद्रशेखर खरमरे, भाजपा नेते रवी सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, प्रा. मधुकर राळेभात, प्रविणशेठ चोरडीया, जामखेड ग्रामीण मंडल तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, शहर मंडलाध्यक्षसंजय (काका) काशिद, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरने, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, लहू शिंदे, संचालक राहुल बेदमुथ्था, जिल्हा अध्यक्ष गणेश पालवे, हानुमंत गावड़े, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, सरपंच पांडुरंग उबाळे, राहुल चोरगे, किसन ढवळे,भाजपा नेत्या सौ लक्ष्मीताई पवार, रूकसाना भाभी, वैशाली शिंदे, निशा राम पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.