Tuesday, March 3, 2026
Home ताज्या बातम्या आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान ...

आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान शहरातील सर्वच मंडळांचा तीन दिवस सन्मान, सभापती प्रा राम शिंदे यांच्या कडून आकाश बाफना यांचे कौतुक

0
317

जामखेड न्युज—–

आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

शहरातील सर्वच मंडळांचा तीन दिवस सन्मान, सभापती प्रा राम शिंदे यांच्या कडून आकाश बाफना यांचे कौतुक

आदर्श फाउंडेशन आयोजित सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सदस्यांचा गुण गौरव व यशोधित सन्मान आयोजित करण्यात आला होता यावेळी जामखेड शहरातील सर्व व्यापारी वर्ग राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

सतत तीन दिवस हा स्तुत्य उपक्रम सुरू होता. हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शहरातील सर्व गणेश मंडळाचे आदर्श फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. सन्मानाचा स्वीकार केला व भविष्यासाठी एक प्रेरणा निर्माण केली.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे बाफना कुटुंबिय यात आपल्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी मोठी भर घातली आहे. शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवत आपला आदर्श निर्माण केला आहे.

जामखेड शहरातील गणेश मंडळाचे आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बाफना यांनी स्वागत केले. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी शहरातील शिवराजे तरूण मंडळ काटकरवस्ती, शंभू राजे बाजारतळ, शिवशांती पोकळेवस्ती, वीरराजे बीड रोड, मार्केट चा सिद्धीविनायक, जय हनुमान तरूण मंडळ जाधव गल्ली, शिवसुर्य प्रतिष्ठान पोलीस स्टेशन रोड, जाणता राजा गृप, पोलीस स्टेशन रोड, धर्मज्योत संभाजीनगर, योध्दा गृप मोरे वस्ती, रामचंद्र तरूण मंडळ कुंभार गल्ली, संघर्ष मित्रमंडळ कोर्ट रोड, जगदंब प्रतिष्ठान मेनरोड, महासंग्राम युवा मंच लक्ष्मी चौक, सावता गृप बोराटे वस्ती यासह अनेक मंडळांना भेटी देत आरती करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच आकाश बाफना यांच्या स्वागत कक्षाला भेट देत आकाश बाफना यांचे कौतुक केले.

आकाश बाफना यांच्या वतीने गणेश मंडळाचे सत्कार आयोजित करण्यात आले होते. या मंचावर शिंदे साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे साहेब बोलत होते. यावेळी बाफना कुटुंबीय तसेच भाजपाचे शिवकुमार डोंगरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आदर्श फाउंडेशन आयोजित गणेशोत्सव 2025
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार रामजी शिंदे साहेब यांनी आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश भाऊ बाफना यांचे कौतुक केले. आकाश भाऊ बाफना यांचे समाज कार्य व गणेश उत्सव मध्ये सहभाग त्यामुळे जामखेड मधील युवा वर्गात असलेली पसंती ही कौतुकास्पद आहे असेही सांगितले.

यावेळी आकाश भाऊ बाफना यांनी सांगितले की जामखेड मध्ये पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपून सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. समाजाप्रति असलेले बांधिलकी याबद्दल सर्वांचे सन्मान करणे हे आमचं कर्तव्य आहे सर्व जामखेड मधील सर्व गणेश उत्सव मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सन्माननीय सदस्य यांचे आदर्श फाउंडेशन तर्फे स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!