हातात गावठी कट्टा घेऊन दहशत तालुक्यातील चौंडी परिसरात दहशत माजवणारा आरोपी दोन दिवसांपूर्वी पोलीसांना पाहून लंपास झाला होता. आज आरोपी पाटोदा शिवारात येणार असल्याची माहिती गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली असता जामखेड पोलीसांनी सापळा रचत आरोपीस जेरबंद केले आहे या धडाकेबाज कामगिरी मुळे जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, दि. ३०/०८/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चोंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा चोंडी ते चापडगाव जाणारे रोडवर त्याचे हातात अग्नीशस्त्र हत्यार विनापरवाना जवळ बाळगून फिरत आहे.
अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सदरची माहीती सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, कुलदिप घोळवे अशांना देवून लागलीच सदरचे पथक खाजगी वाहनाने इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चोंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर याचा शोध घेणेकामी चोंडी येथे रवाना होवून चोंडी गावात शोधघेत असताना अजित लालासाहेब उबाळे रा. चौंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा १८/३० वाजणेचे सुमारास पथकास चौंडी ते चापडगाव जाणारे रोडवर सिना नदीच्या पुलाजवळ दिसला त्यावेळी त्याचे हातात अग्णीशस्त्र हत्यार दिसुन आले तेव्हा आम्ही त्यांचा पाठलाग केला असता तो सदरचे पथकास पाहून नदीच्या किनारी असलेल्या काटेरी झाडात पळुन गेला होता.
त्यानंतर दि. ०२/०९/२०२५ रोजी इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चौंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हागावठी कटटा हत्यार विनापरवाना बेकायदा स्वतःचे ताब्यात बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्मान करताना दिसुन आला आहे. म्हणुन त्याचे विरूध्द पोलीस कॉन्स्टेबल कुलदिप पांडुरंग घोळवे यांनी त्याचे विरुध्द भारतीय हत्यारकायदा कलम ३/२५ व फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ चे कलम ७ सह महाराट्र पोलीस कायदा कलम३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना तो पाटोदा गावचे शिवारात येणार असल्याची गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाल्याने सपोनि श्री नंदकुमार सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, पो कॉन्स्टेबल कुलदिप घोळवे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे अजित लालासाहेब उबाळे यास त्याचे जवळील गावठी कटटयासह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोकॉ देविदास पळसे,पोकॉ कुलदिप घोळवे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ नितीन शिंदे यांनी केली आहे. या धडाकेबाज कामगिरी मुळे जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे.