जामखेड मधील महिलांसाठी खुशखबर रोहिणी काशिद व संजय काशिद यांच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा

0
684

जामखेड न्युज—–

जामखेड मधील महिलांसाठी खुशखबर

रोहिणी काशिद व संजय काशिद यांच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा

गौरी गणपतीच्या आकर्षक व सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, तसेच देशभक्ती जागृती तसेच ग्रामीण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटीच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष जामखेड मंडल संजय (काका) काशिद व सौ. रोहिणी संजय काशिद अध्यक्ष महिला शिवजन्मोत्सव समिती यांनी जामखेड नगरपरिषद हद्दीतील महिलांसाठी
गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहराध्यक्ष जामखेड मंडल संजय (काका) काशिद व सौ. रोहिणी संजय काशिद अध्यक्ष महिला शिवजन्मोत्सव समिती यांच्या माध्यमातून गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

मोहन शंकर ढाळे सराफ यांच्या तर्फे स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सोन्याची नथ व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी विकास अँण्ड घाडगे यांच्या तर्फे 32 इंची एलईडी टिव्ही, तृतीय क्रमांकासाठी शितल कलेक्शन यांच्या वतीने पैठणी तर उत्तेजनार्थ तीन बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेची माहिती
दि. 31 आँगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांने आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, देखावा, व्हिडिओ व फोटो 9420994377 या व्हाटसअप क्रमांकावर पाठवावेत.

30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता दुर्गा शक्ती वाहन रँली होईल व नंतर लोहार देवी मंदिर खर्डा रोड जामखेड येथे बक्षीस वितरण होईल.

स्पर्धेच्या नियम व अटी

स्पर्धेला कोणतेही शुल्क नाही. स्पर्धा मोफत आहे.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. व्हिडिओ व फोटो एच डी मध्ये असावा यात स्पर्धक स्वत:दिसायला हवा. व्हिडिओ दोन मिनिटांपेक्षा अधिक असू नये. गौरी सजावट स्पर्धेमध्ये पारंपरिक, ऐतिहासिक, देशभक्ती उदा मिशन सिंदुर सजावटीचा प्रामुख्याने विचार केला जाईल. ही स्पर्धा जामखेड नगरपरिषद हद्द अंतर्गत राहिल.

याप्रसंगी गौरी सजावट स्पर्धेविषयी बोलताना सौ. रोहणी काशिद म्हणाल्या की, मला अभिमान वाटतोय की या माध्यमातून आम्ही महिलांच्या सुप्त गुणांना बाहेर काढुन त्यांचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमुळे महिलांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. हे माझ्यासाठी कौटुंबिक स्नेह वाढवणारे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here