शिवरायांच्या विचारांचे आचरण करून वैभवशाली राष्ट्र निर्माण करावे – ह भ प गोविंद महाराज जाटदेवळेकर

0
278

जामखेड न्युज—–

शिवरायांच्या विचारांचे आचरण करून वैभवशाली राष्ट्र निर्माण करावे – ह भ प गोविंद महाराज जाटदेवळेकर

शुक्रवार दिनांक 22 आँगस्ट 2025 रोजी ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘”छत्रपती शिवरायांचे विचार ” यावर आधारित ह भ प गोविंद महाराज जाटदेवळेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करतांना वरील आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. ए.पारखे होते. गोविंद महाराज यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंगाचे कथन आपल्या प्रभावी वाणीने करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

बलशाली भारत घडविण्यासिठी विद्यार्थांंनी शिवचरित्रातील शिकवण आत्मसात करावी.राष्ट्रप्रेमी मावळे होऊन आई,वडील, गुरुजन यांची आज्ञा पाळावी. प्रामाणिक अभ्यास करून जिद्द, चिकाटी आणि साहसाने आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करावा.

छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावरील अनेक शौर्यगीतांचे वीर रसात गायन केले. राजमाता जिजाऊ व संत तुकाराम महाराज,संत रामदास महाराज यांनी सांगितलेले विचारधन व शिकवण विद्यार्थ्यांना सांगून बलशाली भारत घडविण्यासिठी विद्यार्थांंनी शिवचरित्रातील शिकवण आचरणात आणावी असे आवाहन केले.

महाराजांना यावेळी वाद्यवृंद व गायनाची उत्तम साथ देणारे ह भ प अमोल महाराज आळंदीकर, ह भ प विश्वा महाराज, ह भ प हरिष नकाते तबलावादक यांची साथसंगत लाभली.

उपप्राचार्य युवराज भोसले व प्राचार्य बी ए पारखे यांनी आदरणीय ह भ प गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी विद्यालयाला भेट दिली व आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब पारखे,उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्पक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक व एन सी सी विभाग प्रमुख अनिल देडे, कार्यालयीन ओ एस ईश्वर कोळी भाऊसाहेब, शिक्षक प्रतिनिधी पांडुरंग वराट, माध्यमिक शिक्षिका प्रतिनिधी सुप्रिया घायतडक, समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे, किशोर कुलकर्णी सर्व अध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर बंधूभगिणी व इ पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here