डीजे मुक्त गणपती उत्सव साजरा करावा – पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद लोखंडे
डीजे वाद्यावर बंदी असल्याने , डीजे न वाजवता पारंपारीक वाद्याचा गणेश मिरवणूकीत वापर करावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी केले आहे. गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक लोखंडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारताना रस्त्याच्या एक तृतीयांश जागेतच मंडप उभारावा. त्यापेक्षा जास्त जागा व्यापनार नाहीत असे नियोजन करावे.यासाठी नगर परिषद आणि पोलीस स्टेशन यांनी लक्ष द्यावे.
मंडळांनी सीसीटीव्ही ची व्यवस्था करावी. गणेश विर्सजन ठिकाणी नगरपरिषदेने पुरेशी प्रकाश व्यवस्था करतानाच, याठिकाणी चांगले पोहोणारे व जीवरक्षक नेमावे असे आवाहन त्यांनी केले.
जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात म्हणाले, गणेशोत्सावात वाहतुक कोंडी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.यासाठी खर्डा चौक ते बीड काॅर्नर दरम्यान रस्त्यावर लागणारे गणपती मुर्तीचे स्टाॅल जुन्या तहसील कार्यालयासमोर लावावेत.अशी सुचना केली.नगरसेवक अमीत चिंतामणी यांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युततारांची उंची वाढवण्याची मागणी केली. जेणेकरून संभाव्य दुर्घटना टळली जाईल.अशी सुचना मांडली आहे.
चौकट
पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनीही येणारा गणेशोत्सव ईद-ए-मिलाद व नवरात्र हे खूप महत्त्वाचे सण आहे जसे यात्रेला आपण सर्वांनी सहकार्य केले तसेच आपल्या कडून या उत्सवाला पण सहकार्य असावे अशी अपेक्षा मला आहे.आपण ते करणार या जामखेडची जी ख्याती आहे ती कायम राहणार याची मला खात्री आहे यावेळी सांगितले.
चौकट –
राष्टवादीचे मंगेश (दादा) आजबे यांनीही ग्रामीण भागात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगत, याकामी त्या गावच्या पोलीसपाटलांची भुमिकाही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.