जामखेड न्युज – – –
भारतात सातत्याने पदकाचा सुवर्णकाळ हुलकावणी देत होता. आज मात्र भारताच्या दृष्टीने सोनियाचा दिन ठरला. भालाफेकीत नीरज चोप्राने विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदकाची कमाई केली, तर पैलवान बजरंग पुनियाने कास्यपदकावर नाव कोरले._
नीरज चोप्राला गोल्ड
टोकियो ऑलिम्पिकचा आज 16 वा दिवस आहे. भारतीय गोल्फर आदिती अशोक पदक जिंकण्यात अपयश ठरली; पण ती शेवटच्या क्षणापर्यंत लढली. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळात तिने चौथे स्थान मिळवले. आदितीनंतर आता नीरज चोप्रा आणि पैलवान बजरंग पुनियावर देशवासीयांच्या नजरा होत्या. नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावून भारताचा दुष्काळ संपविला आहे. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भालाफेक केली. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करून आपले पहिले स्थान कायम ठेवले. तिसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 76.79 मीटर इतका भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत नीरज थोडा मागे पडला. नीरजच्या पाठोपाठ जर्मनीच्या जोहानेस वेटरने 82.52 मीटरचा थ्रो केला. आतापर्यंत एकूण आठ खेळाडूंनी भालाफेक केली आहे. यामध्ये नीरज हा सर्वोच्च स्थानी आहे.
बजरंग पुनियाचे कास्यपदक
भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाक दोन पॉईंट घेतले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरू असताना, पुनियाने आपली आगेकूच कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून दोन पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी 2 पॉईंट घेऊन, आपली आघाडी 6-0 अशी केली. अखेर बजरंग पुनियाने मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.
बजरंग सुरुवातीपासूनचं आघाडीवर
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली. कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होती. बजरंग पुनिया या मॅचमध्ये पहिल्यापासून सकारात्मक खेळ करताना दिसून आला. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला 2-0 अशी आघाडी मिळाली होती. प्रतिस्पर्धीखेळाडू सुरुवातीपासून नकारात्मक खेळ करताना दिसून आला. बजरंग पुनियाने दुसऱ्या राऊंडमध्ये लागोपाठ सहा गुण मिळवत आघाडी भक्कम केली आणि त्याचे विजयामध्ये रुपांतर केले आहे.
मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील राजकीय नेत्यांनी नीरज चोप्रा तसेच बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे. भारताकडे एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके झाली आहेत. लंडन आॅलिपिंकची बरोबरी अजून साधता आलेली नाही.










