अमर चिंचकर यांना पितृशोक, नवनाथ चिंचकर यांचे अल्पशा आजाराने निधन
जिल्हा परिषद शिक्षक अमर चिंचकर यांचे वडील नवनाथ आबा चिंचकर ( वय 79) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कार सावरगाव येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नवनाथ चिंचकर हे संघाच्या मुशित वाढलेले सतत सायकल वर प्रवास करणारे तसेच दररोज चार पाच पेपर वाचण करत होते दररोज रेडिओ बातम्या ऐकत असत सर्वांना भरभरून बोलत असत.
काही दिवसांपूर्वी एका अपघात त्यांच्या खुब्याला मार लागला होता. यामुळे ते आजारी होते काही दिवस ते नगर येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते यातच त्यांचे निधन झाले
नवनाथ चिंचकर यांच्या मागे दोन मुले शिक्षक एक मुलगी सर्व विवाहित, पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे.