जामखेड न्युजचा इफेक्ट जामखेड नगरपरिषदेची मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांविरोधात कारवाईला सुरूवात

0
459

जामखेड न्युज—–

जामखेड न्युजचा इफेक्ट

जामखेड नगरपरिषदेची मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांविरोधात कारवाईला सुरूवात

कोणीही जनावरे मोकाट सोडू नयेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल – मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेड शहरात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सामान्य नागरिक हैराण अशा आशयाच्या बातम्या जामखेड न्युजने प्रसारित केल्या होत्या. याच बातम्यांची दखल घेत जामखेड नगरपरिषदेने भटके जनावरे व मोकाट कुत्र्यांविरोधात कारवाईला सुरूवात केली आहे. ही कारवाई कायम स्वरूपी राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.

जामखेड शहरात गेली आनेक वर्षापासून रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मोकाट जणावरे फिरत आहेत शहरातीच जणावरांचे मालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या जनावरांचा वाहतुकीस आडथळा निर्माण होत होतो म्हणून नगरपरिषदेने कारवाईला सुरूवात केली आहे.

जामखेड नगरपरिषदेने आज सकाळपासूनच कारवाईचा बडगा उगारला असून जवळपास पंधरा ते वीस जनावरांना ताब्यात घेतले त्या पैकी चार जणावरांचे मालक आढळून आले नसल्याने ती जणावरे साकत येथील गोशाळेत सोडण्यात आले तसेच सार्वजनिक रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे मुख्यत गर्दीचे ठिकाणी चौक, बाजारतळ, खर्डा रोड, बीड रोड, मार्केट यार्ड या ठिकाणी कारवाई करण्यात आले आहे.

तसेच नगरपरिषदेच्या वतीने उद्या दि. २८/७/२०२५ पासून रिक्षा फिरवून अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आव्हान नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे.नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडु नये व त्यामुळे अपघात होणार नाहीत व होणाऱ्या कारवाईस टाळावी व नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे.

यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी ज्ञानेश्वर मिसाळ (आरोग्य व पाणीपुरवठा विभाग प्रमुख) , प्रणित सदाफुले (आरोग्य व पाणीपुरवठा विभाग लिपिक), बाळू काळे (मुकादम) व आरोग्य कर्मचारी बाळू लांडगे, कल्याण काळे, सतिश कंगने, अण्णा लोखंडे, भास्कर लोंढे, विजय जाधव ,तानाजी घायतडक, तन्वीर सय्यद, विशाल जाधव आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here