जामखेड न्युज—–
जामखेड शहरातील जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी व मुलांना खाऊ व फळांचे वाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपा मंडलाध्यक्ष संजय काशिद यांचा स्तुत्य उपक्रम
समाजकार्यात अग्रेसर असणारे भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरातील सुमारे 22 जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी व विद्यार्थ्यांना खाऊ तसेच फळे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने शहरातील सुमारे वीस जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी व मुलांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले. मुलांना खाऊ मिळतात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
जिल्हा परिषद शाळांना प्रथमोपचार पेटी ची खुपच आवश्यकता होती. चिमुकले मुले खेळताना बागडताना अचानक कुठे खरचटले जाते त्यावेळी जर शाळेतील प्रथमोपचार पेटी ची मदत होते प्राथमिक उपचार करता येतात.
प्रथमोपचार पेटी व खाऊ तसेच फळे वाटप करताना शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाजप ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, सभापती शरद, कार्ले बापूराव ढवळे ग्रामीण मंडलाध्यक्ष, युवा नेते मोहन मामा गडदे, सोमनाथ पाचरणे, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, तात्याराम पोकळे, पवन राळेभात, भरत जगदाळे, संजय राऊत, विठ्ठल राळेभात, माऊली अंदुरे, गणेश आजबे, आण्णा ढवळे, प्रवीण बोलभट, शिवकुमार डोंगरे, प्रवीण सानप, मोहन देवकाते, प्रवीण बोलभट, बाप्पू माने, मच्छिंद्र देवकाते, शाकीर खान, जमीर सय्यद, आसिफ कमाल, अविनाश कदम, तुषार बोथरा, गणेश मेंढकर, प्रवीण होळकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.