सह्याद्री मेडिकल च्या रूपाने हनुमंत पाटील यांचे स्वप्न साकार होणार – हभप प्रकाश महाराज बोधले
सह्याद्री वेलनेस मेडिकल मुळे जामखेड च्या वैभवात भर
धाडसी व निधड्या छातीचे म्हणून हनुमंत पाटील यांची ओळख होती. मुलांनी व्यवसाय करावा असे त्यांचे स्वप्न होते. काही महिन्यांपूर्वी ते आपल्याला सोडून गेले. कुटुंबीयांनी हे दुख पचवून सह्याद्री वेलनेस मेडिकल सुरू केले आहे. सह्याद्री मेडिकल च्या रूपाने हनुमंत पाटील यांचे स्वप्न साकार होणार आहे. ते 24 तास उघडे राहणार आहे. यामुळे जामखेड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
आज जामखेड शहरात भव्य दिव्य असे अभिषेक पाटील व ब्रम्हा राळेभात यांनी सह्याद्री वेलनेस मेडिकल सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन आज आखील भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, सागर धस, प्रा. मधुकर राळेभात, दत्ताभाऊ वारे, डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, अजय काशिद,कैलास वराट, नंदकुमार कांबळे, रमेश आजबे, मंगेश आजबे, शिवाजी डोंगरे, सुरेश वराट, शहादेव वराट, भाऊ पाटील, सुंदरदास बिरंगळ, अँड. शिवप्रसाद पाटील, तात्या बांदल, प्रा. दादासाहेब मोहिते, अरूण मुरूमकर, दादासाहेब दिवटे, ईश्वर मुरूमकर, अरूण निंबाळकर, कांतीलाल वराट, रघुनाथ दिवटे, भास्कर दिवटे, दादासाहेब ढवळे, शिंदे सर, अमित जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे, भिमराव बारवकर, वाळुंजकर भिमराव, पोलीस पाटील महादेव वराट, श्रीराम घोडेस्वार, रोहित घोडेस्वार, नामदेव राळेभात, राजाभाऊ वराट, राजाभाऊ मुरूमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हभप प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मान्यवर जामखेड करांची उर्जा आहे. सर्वांना हे मेडिकल आपले वाटणार आहे. आपली उपस्थिती हिच प्रेमाची पावती आहे. सह्याद्री नाव म्हणजे धैर्य आहे. रूग्णांचा आशिर्वाद हिच खरी संपती आहे. असे सांगितले.
यावेळी प्रा. लक्ष्मण ढेपे, डॉ. भगवानराव मुरूमकर, कैलास वराट, अजय काशिद, संजय वराट, प्रा. मधुकर राळेभात, सागर धस यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रत्येकांनी स्वर्गीय हनुमंत पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सह्याद्री वेलनेस मेडिकल 24 तास उघडे राहणार आहे तसेच आधुनिक पद्धतीचे असणारे हे मेडिकलग्राहकांना वाजवी किंमत दर्जेदार औषधे यामुळे जामखेडच नव्हे तर आष्टी व पाटोदा करांच्या पंसतीस उतरणार असे सागर धस यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी तर आभार नामदेव राळेभात यांनी मानले.