सराईत गुन्हेगारास जामखेड पोलीसांनी पाठलाग करून पकडले
सराईत गुन्हेगाराच्या नावे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व घरफोडी चे गुन्हे
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत तसेच सोलापूर, वाशी जिल्हा धाराशिव या पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच घरफोडी चे गुन्हे असणारा सराईत गुन्हेगारास जामखेड पोलीसांनी पाठलाग करून पकडले या पोलीसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.
दि. २४/७ / २०२५ रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०४ / २०२३ भादंवि कलम ३७६ वगैरे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी नामे ज्ञानेश्वर लिंग्या काळे, रा. जांब, ता.भुम, जि. धाराशिव हा मिलिंदनगर जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे येणार आहे. अशी गुप्त माहीती मिळाल्याने सदरची बातमी ही पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सपोनि नंदकुमार सोनवलकर, पो.स. ई. किशोर गावडे, पो.कॉ.देवा पळसे, पोकॉ कुलदीप घोळवे, पो. कॉ. ईश्वर माने, पोकॉ प्रकाश मांडगे यांनी लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी रवाना होवून मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक संशयित इसम मिलिंदनगर परीसरात काटवनात स्वतःचे अस्तित्व लपवत असल्याचे पोलीसांचे निदर्शनास आले.
त्यावेळी पोलीस पथकाची त्यास चाहुल लागताच तो काटवनाचा आडोशा घेवुन पळुन जावु लागला असता पोलीस पथकांनी त्याचा पाठलाग करून पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर लिंग्या काळे, वय २२ वर्षे, रा.जांब, ता. भुम, जि. धाराशिव असे असल्याचे सांगितले त्यावळी त्याची झडती घेतली असता त्याचे हातात एक लोखंडी तलवार मिळुण आल्याने लागलीच पोसई गावडे यांनी दोन पंचांना बोलावुन सदरची लोखंडी तलवार हस्तगत करुन जप्त केली.
त्याचेविरुध्द जामखेड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ४२० / २०२५ आर्म अॅक्ट ४ / २५ प्रमाणे गन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी नामे ज्ञानेश्वर लिंग्या काळे, रा. जांब, ता. भुम, जि. धाराशिव हा सराईत गुन्हेगार असुन सदर आरोपीने अशा प्रकारचे आजून गुन्हे केले आहेत काय याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदर आरोपीवर जामखेड, कर्जत, सोलापूर, वाशी पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
जामखेड पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. ४०४/२०२३ भादंवि कलम ३७६, बा.ले.अ.प्र.का. कलम ९,१०,११ प्रमाणे तसेच रजि.नं. २६१/ २०२३ भादंवि क. ४५७,३८० प्रमाणे तसेच गु. रजि. नं. ४२०/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे
सोलापूर पोलीस स्टेशनला गुरजि. नं. १५७/२०२२ भादंवि क. ३९६,३९७ प्रमाणे
धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस गु. रजि. नं. १६५ / २०२२ भादंवि क. ३९५.४५७,३८० प्रमाणे तसेच गु. रजि.नं. १५८/२०२९ भादंवि क. ४५७,४८० प्रमाणे
कर्जत पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. ४२८/२०२४ आर्म अॅक्ट ४ / २५, भादंवि क. ३२४, वगैरे प्रमाणे अशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर व गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि नंदकुमार सोनवलकर, पो.स. ई. किशोर गावडे, पोकों देवा पळसे, पोकों कुलदीप घोळवे, पो.कॉ. ईश्वर माने, पोकॉ प्रकाश मांडगे सायबर सेलचे पोकों नितीन शिंदे व राहुल गुंडू यांनी केलेली आहे.