विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!! महाराष्ट्रात प्रथमच मुलांना इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज साकत येथे मोफत प्रवेश

0
665

जामखेड न्युज—–

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!!

महाराष्ट्रात प्रथमच मुलांना इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज साकत येथे मोफत प्रवेश

चेतना सेवा संस्था या संस्थेला 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रात प्रथमच इंदिरा पोलिटेक्निक कॉलेज ला सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत प्रवेश दिला जात आहे तेव्हा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

यावेळी बोलताना संस्थेचे सचिव डॉ. सुहास सूर्यवंशी म्हणाले कि ग्रामीण भागातील मुले फी अभावी शिक्षणासाठी वंचित राहू नयेत त्यांचे आर्थिक सक्ष्मीकारण होणे गरजेचे आहे त्यांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात पोलिटेक्निक सारख्या कोर्सेस झालेल्या विध्यार्थ्यांना खूप मागणी आहे कोणत्यानी कंपनीमध्ये कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये किमान पगार मिळत आहे तेव्हा विध्यार्थ्यानी डिप्लोमा कोर्स पूर्ण करून सक्षम व्हावे.

इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोर्स

कॉम्प्युटर इंजिनियर,(60 जागा) आर्टिफिशियल इंटीलीजेस (AI ),(60 जागा), मॅकेनिकल इंजिनिअर ,(60 जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअर ,(60 जागा), इन्फॉर्मेशन टॅकनॉलॉजी (IT) ,(60 जागा), व सिव्हिल इंजिनिअर ,(60 जागा), असे कोर्सेस सुरु झाले आहेत. वरील कोर्सेस प्रत्येकी तीन वर्षांचे आहेत.

या कॉलेजची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत, सुसज्ज लायब्ररी, सुसज्ज लॅब, अनुभवी प्राध्यापक वर्ग, मुलींसाठी होस्टेल, येण्याजाण्यासाठी बस सेवा, कुठलेही प्रकारचे डोनेशन नाही, सरकारी नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. 

तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रात एक मजबूत करिअर घडवण्यासाठी अनेक विद्यार्थी दहावी नंतर पॉलिटेक्निक कोर्सेस निवडतात. दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमामध्ये प्रवेश घेतल्याने उत्तम करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात.

तेव्हा पॉलिटेक्निक कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची college code -05668 असून शेवटची तारीख 4/7/2025 वाढवली आहे आणि सर्व प्रवर्गातील मुलींना देखील प्रवेश मोफत आहे तेव्हा विध्यार्थ्यानी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन डॉ.सुहास सूर्यवंशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here