सभापती प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून चौंडी विकास आराखड्यासाठी 1041.32 कोटींचा निधी स्मृतीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी ६८१ कोटी ३२ लाख तर रस्त्यांसाठी ३६० कोटी
सभापती प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून चौंडी विकास आराखड्यासाठी 1041.32 कोटींचा निधी
स्मृतीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी ६८१ कोटी ३२ लाख तर रस्त्यांसाठी ३६० कोटी
चौंडी (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांचा विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केला होता आता परत चौंडीला जोडणाऱ्या रस्ता कामासाठी पावसाळी अधिवेशनात ३६० कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे चौंडी विकास आराखड्यासाठी 1041.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
6 मे 2025 रोजी झालेल्या चौंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीत 681.32 कोटींचा चौंडी विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 154 कोटी निधीच्या कामांना स्थापत्य सल्लागार नेमणूक प्रक्रियेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे. याचबरोबर पावसाळी अधिवेशनात रस्ते कामांसाठी 360 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये ठामपणे मांडलेल्या मागण्यांच्या फलश्रुती स्वरूप, श्री क्षेत्र चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाची सुधारणा करण्यासाठी ₹३६० कोटींची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.
या आधीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने, राज्य शासनाच्या वतीने ६ मे रोजी श्री क्षेत्र चोंडी येथे आयोजित केलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, श्री क्षेत्र चोंडी साठी ₹६८१.३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला होता.
त्यानुसार आता ₹६८१.३२ + ₹३६० असा एकूण ₹१०४१.३२ कोटींचा भरीव निधी श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्यासाठी उपलब्ध झालेला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त राज्य शासनाच्या वतीने श्री क्षेत्र चोंडी येथे उपलब्ध करून दिलेल्या या ऐतिहासिक विकास आराखड्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद सभापती प्रा श्री राम शिंदे यांच्यासह संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाचे मन:पूर्वक चौंडी करांनी मानले आहेत.