आमदार रोहित पवार गटाला जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्का उपसभापती कैलास वराट यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल

0
887

जामखेड न्युज—–

आमदार रोहित पवार गटाला जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्का

उपसभापती कैलास वराट यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल

दोन वर्षांपूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोहित पवार गटाचे नऊ व सभापती नामदार प्रा राम शिंदे यांचे नऊ संचालक निवडून आलेले असताना मागील वेळी ईश्वर चिट्ठीने भारतीय जनता पार्टीचा विजय झाला होता विजयाच्या रूपाने शरद पंडित कार्ले हे सभापती पदी विराजमान झाले होते व उपसभापती पदी रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झालेली होती.

मागील दोन वर्षांमध्ये रोहित पवार गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळोवेळी विकास कामांना अडथळे आणल्यामुळे रोहित पवार गटाचे तीन संचालक अंकुश ढवळे ,राहुल बेदमुथा व नारायण जायभाय यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सभापती नामदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला

आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसभापती यांच्यावर 18 पैकी 12 संचालकांनी सह्या करून अविश्वास ठराव दाखल केला आहे.

आठ दिवसात जिल्हाधिकारी यांच्या कडून अविश्वास ठरावावर मतदानासाठी तारीख येईल यानंतर अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या गटाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. अनेक नेते रोहित पवार यांना सोडचिठ्ठी देत सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. रोहित पवार यांचे अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

आमदार रोहित पवार यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here