गौतम भोसले यांनी कामाच्या गुणवत्तेत तडजोड केली नाही – उपअभियंता विठ्ठल माने एकही तक्रार नसणारा अधिकारी म्हणून भोसले यांची ओळख – गटविकास अधिकारी शुभम जाधव विविध मान्यवरांच्या हस्ते शाखा अभियंता गौतम भोसले यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
गौतम भोसले यांनी कामाच्या गुणवत्तेत तडजोड केली नाही – उपअभियंता विठ्ठल माने
एकही तक्रार नसणारा अधिकारी म्हणून भोसले यांची ओळख – गटविकास अधिकारी शुभम जाधव
विविध मान्यवरांच्या हस्ते शाखा अभियंता गौतम भोसले यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
सव्वीस वर्षे विनातक्रार सेवा करणे सोपी गोष्ट नव्हे ती गौतम भोसले यांनी लिलया पार पाडली आपली सेवा आनंददायी केली. दर्जेदार कामासाठी खुपच तळमळ होती. याबाबत कधीही तडजोड केली नाही असे मत उप अभियंता विठ्ठल माने यांनी शाखा अभियंता गौतम भोसले यांच्या सेवा पुर्ती सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता गौतम भोसले यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास खैरे, उपअभियंता विठ्ठल माने, उप अभियंता एम. एम फकिर, शाखा मंगेश निमजे, मंगेश आजबे, शांतीलाल भोसले, गौतम भोसले, सौ. सुनिता भोसले, शिवाजी भोसले, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे, प्रशांत सातपुते, सरपंच महारुद्र महारनवर, डॉ. राळेभात, हरीभाऊ वराट, मनोज भोरे, बबनराव बहिर, नरेंद्र जाधव, प्रशांत शिंदे, राहुल चोरगे, गणेश लटके, संभाजी ढोले, परसराम उतेकर यांच्या सह अनेक सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपअभियंता माने म्हणाले की,भोसले यांची कामाची पद्धत आगळीवेगळी होती त्यांनी मैत्रीत कधीही अंतर पडू दिले नाही. दर्जेदार कामाबद्दल नेहमी अग्रही असायचे त्यांनी आपली २६ वर्ष सेवा दोनच तालुक्यात केली कर्जत मध्ये १२ वर्षे तर जामखेड मध्ये १४ सेवा केली. त्यांच्या अनुभवाची शिदोरी तरुणांसाठी आदर्श ठरणारी आहे. कितीही कामाचा लोड असला तरी कधीही चिडचिड केली नाही. दर्जेदार कामे करून जनतेला न्याय दिला त्यांचे मन हेल्दी होते त्यामुळे आरोग्यही हेल्दी राहिले.
यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी बोलताना सांगितले की, आजही भोसले कुटुंब एकत्र आहे. त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. एकही तक्रार नसणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. हीच त्यांची खासियत आहे.
यावेळी बोलताना सत्कारमुर्ती गौतम भोसले म्हणाले की, आजही एकत्र कुटुंब ही आमच्या कुटुंबियांची खासियत आहे. मी सेवेच्या काळात सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळेच कदाचित माझी कधीही तक्रार झालेली नसावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन युवराज ढेरे यांनी केले. आभार शिवाजी भोसले यांनी मानले.