नागेश घायाळ यांची जामखेड तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी म्हणून नियुक्ती

0
301

जामखेड न्युज—–

नागेश घायाळ यांची जामखेड तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी म्हणून नियुक्ती

पोलिसांच्या सोबत व बरोबरीने प्रसंगोपात्त प्रथमोपचार, अग्निशमन दलाला मदत, वाहतूक नियंत्रण, नैसर्गिक आपत्तिग्रस्तांना मदत, दंगलग्रस्त परिस्थितीचे नियंत्रण इत्यादी कामे चोख बजावणाऱ्या होमगार्ड च्या जामखेड तालुका समादेशक पदी नागेश घायाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे.

डॉ. सुरेश काशिद हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या जागेवर नागेश घायाळ यांच्या नियुक्ती चे पत्र जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिले आहे. सध्या जामखेड तालुक्यात 98 होमगार्ड कार्यरत आहेत. 

नागेश घायाळ हे दिनांक १०/९/१९९१ होमगार्ड संघटनेमध्ये दाखल तसेच दिनांक १/११/२००४ ते ३१/१२/२०२४ पर्यत पथकामध्ये अंशकालीन लिपिक म्हणून पदभार घेऊन पथकाचे काम पाहीले आहे.

तसेच १८/१/२०१९ मध्ये पदोन्नती मिळवून वरिष्ठ पलटन नायक पथकामध्ये काम पाहिले व दिनांक २४/६/२०२५ रोजी जामखेड तालुका पथकामध्ये तालुका समादेशक अधिकारी म्हणून पदभार मे मा अप्पर पोलिस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक यांच्या आदेशानुसार पदभार दिनांक २६/६/२०२५ रोजी स्वीकारला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here