काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट गाड्यांवर जामखेड पोलीसांची धडक मोहीम

0
1019

जामखेड न्युज—–

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट गाड्यांवर जामखेड पोलीसांची धडक मोहीम

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळ्या काचा तसेच फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट (मोटार सायकल) तसेच कर्णकर्कश आवाज करणारे तसेच विना लायसन्स वाहने चालवणे आता महागात पडणार आहे कारण या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. कर्णकर्कश आवाज असणाऱ्या तसेच काळ्या काचा गाड्या वर जामखेड पोलीसांनी धडक मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. यामुळे नियमबाह्य वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेड चा नुकताच पदभार घेतला असून परिसरातील हाॅटेल चालकांसाठी एक नियमावली केली आहे रात्री अकरा वाजता सर्व हाॅटेल बंद केले जातात तसेच कलाकेंद्र एक वाजता बंद केले जातात, अवैध दारू विक्री व अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

पालकमंत्र्याचे आदेश

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काळ्या काचांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. काळ्या फिल्ममुळे वाहनातील व्यक्तींची ओळख पटवणे कठीण होते, ज्यामुळे अवैध कृत्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असते. याशिवाय, रस्ते सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढतो. यामुळे नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यानुसार जामखेड पोलीसांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईस सुरूवात केली आहे.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांकडून बऱ्याच नियमबाह्य गाड्या जप्त करण्यात आल्या. विशेषतः बुलेट मोठ्या आवाजाचा सायलेंसर बसवलेल्या बऱ्याच बुलेट गाड्या जप्त करत जामखेड पोलीस स्टेशनला आणून कागदपत्रे तपासणी करत या वाहनचालकांना दंड ठोठावला आहे. तसेच काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचे जामखेड च्या नागरिकांनी कौतुक केले आहे.

तसेच शाळा काॅलेज परिसरात मोकाट फिरणारे तसेच रोड रोमिओ यांच्या वर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यांचा लवकरच बंदोबस्त करू याचबरोबर रस्त्यावर गाड्या लावणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, गाड्या रेस करणे, ट्रिपल सीट गाड्या चालवणे या नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.

वाहनचालकांना आवाहन

वाहनचालकांनी नियमाचे पालन करावे, ट्रिपल सीट गाड्या चालवू नयेत, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा गाड्या उभ्या करू नयेत तसेच काळ्या काचा विरोधातील मोहीम सगळीकडे राबवली जाणार असून, नागरिकांनी स्वतःहून काळ्या फिल्म काढण्याचे आवाहन केले आहे. काळ्या काचांचा वापर मोटर वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि यामुळे दंडासह वाहन जप्तीचाही धोका आहे. ही मोहीम काही दिवसांपुरती मर्यादित नसेल, तर जोपर्यंत काळ्या काचांचा वापर पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत ती सुरू राहील. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि स्वतःच्या वाहनांवरील काळ्या फिल्म तातडीने काढाव्यात

(पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here