वुशू खेळाडूंनी जामखेड चा नावलौकिक वाढवला -संजय काशिद भाजपा शहरमंडलाच्या वतीने वुशू खेळाडूंचा सन्मान

0
337

जामखेड न्युज—–

वुशू खेळाडूंनी जामखेड चा नावलौकिक वाढवला -संजय काशिद

भाजपा शहरमंडलाच्या वतीने वुशू खेळाडूंचा सन्मान

मॉस्को, रशिया येथे नुकतीच मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेड चा खेळाडू रोहित थोरात याने भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक प्राप्त केले. तसेच राज्यस्तरीय सीनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धेत योगेश वाघमोडे व सुरेश राऊत यांनी सुवर्णपदक मिळवले यामुळे त्यांची राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे तसेच राज्यस्तरीय ज्युनिअर वुशु स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले यामुळे राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या चारही खेळाडूंनी जामखेडचा चा नावलौकिक वाढवला आहे असे मत भाजपा अध्यक्ष शहर मंडल यांनी व्यक्त केले.

यावेळी जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, युवा नेते सुरज काळे, शंभू सुर्य मर्दानी आखाडा प्रमुख बबलू टेकाळे, विक्रांत घायतडक, श्याम पंडित, शिवाजी थोरात, विनोद क्षिरसागर, किशोर काळे जगदंब प्रतिष्ठान अध्यक्ष, राजू भांबे, बाळू निमोणकर, गणेश माने, रोणित खुपसे, दिपक सुरसे, विक्रांत घायतडक, अल्ताफ शेख, अवधूत वासकर, करण कळसकर, यांच्या सह वुशू खेळाडू उपस्थित होते.

या खेळाडूंना अहिल्यानगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू व एन आय एस कोच लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष श्याम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यांचाही सन्मान करण्यात आला.

रोहित थोरात
जामखेड चे वुशू खेळाडू रोहित थोरात यांने आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया येथे झालेल्या मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवले म्हणून सन्मान करण्यात आला.

श्रेयश वराट

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने आंबेगाव, पुणे येथे नुकतीच राज्यस्तरीय ज्युनिअर वुशु निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेडचा खेळाडू श्रेयस सुदाम वराट याने सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक मिळवला यामुळे हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

योगेश वाघमोडे व सुरेश राऊत

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन च्या मान्यतेने जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे नुकतीच 23 वी राज्यस्तरीय सीनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये जामखेड चा खेळाडू योगेश वाघमोडे याने 48 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक तर सुरेश राऊत याने 56 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळविले. यामुळे दोघांची निवड जयपूर ( राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर वूशु अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here